चांदीच्या भावात एकाच दिवसात दोन हजारांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST2021-09-05T04:20:07+5:302021-09-05T04:20:07+5:30
जळगाव : शुक्रवारी ५०० रुपयांची घसरण झालेल्या चांदीच्या भावात शनिवार, ४ सप्टेंबर रोजी एकाच दिवसात दोन हजार रुपयांनी वाढ ...

चांदीच्या भावात एकाच दिवसात दोन हजारांनी वाढ
जळगाव : शुक्रवारी ५०० रुपयांची घसरण झालेल्या चांदीच्या भावात शनिवार, ४ सप्टेंबर रोजी एकाच दिवसात दोन हजार रुपयांनी वाढ झाली. यामुळे चांदीचे भाव ६६ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. सोन्याच्याही भावात ३०० रुपयांनी वाढ होऊन ते ४८ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.
गेल्या दोन महिन्यांपासून किरकोळ तर कधी मोठा चढ-उतार होत असलेल्या चांदीच्या भावात शनिवारी पुन्हा मोठी भाववाढ झाली. याच्या एक दिवस अगोदरच शुक्रवार, ३ सप्टेंबर रोजी ५०० रुपयांची घसरण होऊन ६४ हजार ५०० रुपयांवर आलेल्या चांदीला सट्टे बाजारातील खेळीने अचानक मागणी वाढली व चांदीत थेट दोन हजारांनी वाढ झाली. गेल्या दोन महिन्यांपासून चांदीत अचानक वाढ, तर कधी अचानक मोठी घसरण होत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. ५ जुलै रोजी चांदीत एक हजाराने वाढ होऊन ती ७१ हजारांवर पोहोचली होती. मात्र, ९ ऑगस्ट रोजी चांदीत थेट दोन हजार ५०० रुपयांची घसरण झाली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी १० ऑगस्ट रोजी पुन्हा एक हजार ५०० रुपयांची घसरण झाल्याने चांदी ६५ हजारावर आली होती. त्यानंतर, मात्र १४ ऑगस्ट रोजी एक हजाराने वाढ होऊन ती ६६ हजारांवर पोहोचली, तर २१ ऑगस्ट रोजी पुन्हा एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ६५ हजारांवर आली होती. त्यानंतर, अधून-मधून ५०० रुपयांपर्यंत चढ-उतार सुरू होता. मात्र, शनिवारी तर एकाच दिवसात दोन हजारांची पुन्हा वाढ झाली.
अशाच प्रकारे सोन्याच्याही भावात चढ-उतार सुरू असली, तरी जास्त नाही. मध्यंतरी ९ ऑगस्ट रोजी एकाच दिवसात एक हजार ३०० रुपयांची घसरण सोन्यात झाली होती. शनिवार, ४ सप्टेंबर रोजी ३०० रुपयांची वाढ झाली.
चांदीतील चढ-उतार
दिनांक-फरक-भाव
५ जुलै २०२१-१००० ने वाढ-७१,०००
९ ऑगस्ट- २,५०० घसरण- ६६,५००
१० ऑगस्ट- १,५०० घसरण- ६५,०००
१४ ऑगस्ट- १,००० वाढ- ६६,०००
२१ ऑगस्ट- १,५०० घसरण- ६५,०००
४ सप्टेंबर- २,००० वाढ- ६६,५००