चांदीच्या दरात तीन हजारांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:16 IST2020-12-24T04:16:00+5:302020-12-24T04:16:00+5:30

जळगाव : दोन दिवसांपूर्वी दोन हजार ५०० रुपयांनी वाढ झालेल्या चांदीच्या दरात बुधवार, २३ डिसेंबर रोजी थेट तीन हजार ...

The price of silver fell by three thousand | चांदीच्या दरात तीन हजारांनी घसरण

चांदीच्या दरात तीन हजारांनी घसरण

जळगाव : दोन दिवसांपूर्वी दोन हजार ५०० रुपयांनी वाढ झालेल्या चांदीच्या दरात बुधवार, २३ डिसेंबर रोजी थेट तीन हजार रुपयांनी घसरण होऊन ती ६७ हजार ५०० रुपयांवर आली आहे, तर सोन्याच्याही दरात ३०० रुपयांनी घसरण होऊन ते ५० हजार ७०० रुपयांवर प्रतितोळा आले आहे.

कोरोना लस, इंग्लंडमधील नवीन संसर्ग तसेच सट्टा बाजारातील खरेदी-विक्री यामुळे सुवर्ण बाजार अस्थिर होत आहे. यात सोमवार, २१ डिसेंबर रोजी चांदीच्या दरात वाढ होऊन ती ७१ हजारांवर पोहोचली होती. त्यानंतर मंगळवारी त्यात ५०० रुपयांनी घसरण झाली व ती ७० हजार ५०० रुपयांवर आली होती. बुधवारी तर यात पुन्हा तीन हजार रुपये अशी मोठी घसरण होऊन ती ६७ हजार ५०० रुपयांवर आली. अशाच प्रकारे २१ डिसेंबर रोजी सोन्याच्याही दरात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५१ हजार ४०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. त्यानंतर मंगळवारी ४०० रुपयांनी घसरण होऊन ते ५१ हजार रुपयांवर आले. बुधवारी त्यात पुन्हा ३०० रुपयांनी घसरण झाली.

Web Title: The price of silver fell by three thousand