मुहूर्ताच्या कापसाला नऊ हजारांचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:18 IST2021-09-18T04:18:14+5:302021-09-18T04:18:14+5:30

पहूर, ता. जामनेर : नवीन कापसाची आवक बाजारात सुरू झाली आहे. पहूर कसबेतील दोन व्यापाऱ्यांनी मुहूर्ताच्या खरेदी ...

The price of cotton of the moment is nine thousand rupees | मुहूर्ताच्या कापसाला नऊ हजारांचा भाव

मुहूर्ताच्या कापसाला नऊ हजारांचा भाव

पहूर, ता. जामनेर : नवीन कापसाची आवक बाजारात सुरू झाली आहे. पहूर कसबेतील दोन व्यापाऱ्यांनी मुहूर्ताच्या खरेदी केली. यात एकाने ९००१ रुपये तर, दुसऱ्या व्यापाऱ्याने ७७७७ रुपये भाव दिला.

नवीन कापूस खरेदीचा शुभारंभ भुसार मालाचे व्यापारी नीलेश मधुकर लाहसे यांनी भगवान विठ्ठल भडांगे या शेतकऱ्याचा कापूस खरेदी करून केला. तर मधुकर अशोक बनकर यांनी शरद माधव पाटील यांचा कापूस खरेदी केला. त्यांनी ७७७७ रुपये भाव दिला.

यावेळी उपसरपंच राजेंद्र जाधव, माजी सरपंच शंकर जाधव, उत्तर महाराष्ट्र धनगर समाज प्रमुख रामेश्वर पाटील, माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे, ईश्वर बाबूजी जैन पतसंस्थेचे चेअरमन भास्कर पाटील, अॅड. संजय पाटील, भाजपा ओबीसी सेल तालुकाध्यक्ष वासुदेव घोंगडे, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण गोरे, रामचंद्र वानखेडे, श्रावण घोंगडे, उत्तम लाहसे, रामदास भडांगे, मधुकर लाहसे,अर्जून लाहसे, अशोक बनकर, सुरेश बनकर आदी उपस्थित होते.

Web Title: The price of cotton of the moment is nine thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.