‘त्या’ प्रियकराचा अटकपूर्व फेटाळला
By Admin | Updated: February 3, 2017 00:40 IST2017-02-03T00:40:26+5:302017-02-03T00:40:26+5:30
अभियंता तरुणीची आत्महत्या प्रकरण : एकीला फसवून दुसरीशी थाटला संसार

‘त्या’ प्रियकराचा अटकपूर्व फेटाळला
जळगाव : अभियंता तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी तिचा प्रियकर प्रसाद दीपक नंद (रा.बालाजी नगर, भूमी अभिलेख कॉलनी, अकोला) याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. दरम्यान, त्याचा ठावठिकाणा दिल्यानंतरही पोलिसांकडून त्याला अटक केली जात नसल्याचा आरोप तरुणीच्या वडीलांनी केला आहे.
2 जानेवारी रोजी या उच्चशिक्षित तरुणीने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली होती. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती, मात्र नंतर सोशल मीडियावरील लगAासंबंधी दोघांमध्ये झालेला संवादाचा पुरावा मिळाल्यावर 15 जानेवारी रोजी प्रसादविरुध्द तालुका पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. माधुरी (नाव बदलले आहे) व प्रसाद यांचे 2007 पासून प्रेमसंबंध होते. प्रसाद हा 2006 ते 2010 या कालावधीत बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. माधुरीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लगA करण्याचे आमिष दाखविले होते, मात्र तिला अंधारात ठेवून प्रसाद याने 2 जानेवारी 2016 रोजी बार्शी, जि.सोलापुर येथील दुस:या मुलीशी लगA केले.
लगAानंतरही तो माधुरीशी सोशल मीडियावर संपर्कात राहिला. तिला लगA करण्याचे खोटे आश्वासन दिले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर माधुरीने प्रसादच्या लगAाच्या वाढदिवसालाच गळफास घेऊन जीवन संपविले होते.
माधुरीच्या वडीलांनी गुरुवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांची भेट घेतली. प्रसादचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आला आहे, त्यामुळे आतातरी त्याला अटक करावी अशी विनंती त्यांनी सांगळे यांना केली.