चाळीसगावला १०९ विज्ञान प्रयोगांचे सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 21:37 IST2019-12-23T21:37:30+5:302019-12-23T21:37:40+5:30
विज्ञान प्रदर्शन : २१८ विद्यार्थ्यांसह सात शिक्षकांनी नोंदविला सहभाग, मान्यवरांनी केले कौतुक

चाळीसगावला १०९ विज्ञान प्रयोगांचे सादरीकरण
चाळीसगाव : प्रत्येक क्षेत्रात विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने जर नवीन पिढी त्यात अज्ञानी राहिली तर भारताचे भविष्य अंधारात जाईल. म्हणून आजच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी नवनवीन संकल्पनांवर आधारित विज्ञान प्रदर्शन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी बहाळ येथे केले.
सोमवारी माध्यमिक विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी १०८ प्रयोगांचे सादरीकरण झाले. २१८ विद्यार्थ्यांसह सात शिक्षकांनी देखील सहभाग नोंदविला. मंचावर प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून खासदार उन्मेष पाटील, कार्यक्रमाच्या अध्यक्ष पं.स.सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, मार्केट सभापती सरदार राजपूत, न.पा.गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, जि.प.सदस्या मंगला जाधव, मोहिनी गायकवाड, माजी पं स सदस्य दिनेश बोरसे, पं.स.सदस्य सुभाष पैलवान, पियुष साळुंखे, सुनील पाटील, दत्तू मोरे, भाजपा तालुका उपाध्यक्ष कपिल पाटील, गटशिक्षणाधिकारी विलास भोई, विस्तार अधिकारी जितेंद्र महाजन, रा.वि.संचालक सुधीर आबा पाटील, मार्केट संचालक मच्छिंद्र राठोड, अलकनंदा भवर, नगरसेवक बापू अहिरे, नगरसेविका विजया प्रकाश पवार, विजया भिकन पवार, नमोताई राठोड, मुख्याध्यापक अशोक देवरे, पर्यवेक्षक वाय.आर.सोनवणे, माजी नगरसेवक निलेश महाराज, कैलास पाटील बहाळ गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.प. सदस्य. विकासो चेअरमन, व्हा.चेअरमन, तालुकाभरातील विज्ञान शिक्षक आदी उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनाच्या प्रसंगी खासदार उन्मेष पाटील यांनी आर्टिफिशिएल इंटेलिजन्स ही येणा?्या काळातील संकल्पना असून त्यावर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त भर द्यावा असे सांगितले.
प्रास्ताविक ए.एन.देवरे यांनी केले. सूत्रसंचालन मोरे व दिनेश बोरसे यांनी केले.