नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणा-या निवडणुकांसाठी तयार रहा, जळगावात अशोक चव्हाण यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 14:06 IST2018-01-24T14:06:34+5:302018-01-24T14:06:40+5:30

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणा-या निवडणुकांसाठी तयार रहा, जळगावात अशोक चव्हाण यांचे आवाहन
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 24- नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात आगमी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात, त्यासाठी तयार रहा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.
जळगावात आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता शिबिरप्रसंगी बुधवारी दुपारी ते बोलत होते. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात या शिबिरास प्रारंभ झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही उपस्थित आहेत. भारतीय राज्यघटना आपल्याला हवी तशी बदलण्याचे काम सध्या सरकार करीत आहे. याविरुद्ध आपण आवाज उठवित आहोत. केंद्र व राज्य शासनाने अनेक आश्वासन दिली मात्र त्यांची पूर्तता केली नाही. त्यामुळे लोक नाराज असून हे सरकार खाली खेचण्यासाठी निवडणुकांची वाट पाहत आहे, असे ही अशोक चव्हाण म्हणाले.