शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

समूह शाळांचे प्रस्ताव तयार करा; जळगावच्या शिक्षणाधिकाऱ्यांची सूचना!

By अमित महाबळ | Updated: October 29, 2023 19:04 IST

प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळेल, सहशालेय उपक्रमांचे प्रभावी आयोजन करता येईल.

जळगाव : शून्य ते २० पटसंख्या असलेल्या शाळांची प्राधान्याने पडताळणी करावी, त्या ठिकाणी पटसंख्या वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. समूह शाळा योजनेमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी आणि वर्गासाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध होईल. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळेल, सहशालेय उपक्रमांचे प्रभावी आयोजन करता येईल. त्यामुळे समूह शाळा योजनेकडे कोणीही नकारात्मक दृष्टीने न पाहता आवश्यक आहे तेथे या शाळेचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केली आहे.

वार्षिक कार्य योजना अंदाजपत्रक २०२३-२४ आणि २४-२५ बाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच ला. ना. शाळेच्या गंधे सभागृहात झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील, जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, डायटचे प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे उपस्थित होते.

शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून दुरुस्त करावयाच्या वर्ग खोल्या, मतदानासाठी असलेल्या वर्ग खोल्यांबाहेर रॅम्प व भौतिक सुविधा पूर्ण करण्याची कामे, तसेच बाला अंतर्गत मंजूर कामे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन केले. एकाच आवारात भरणाऱ्या मुलामुलींच्या शाळा एकत्रित करण्याच्या सूचना राज्यस्तरावरून आले आहेत. त्यामुळे त्यांचे प्रस्ताव गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सादर करावेत, अशी सूचना केली. गणिताचे दहा दिवस या उपक्रमामध्ये जिल्ह्यात २० टक्केपेक्षा जास्त प्रगती दिसून आली असून, भडगाव, भुसावळ व चाळीसगाव तालुक्यांमध्ये चांगली प्रगती झाल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी कौतुक केले. आधारसाठी आठ दिवसांची मुदत

जिल्ह्यातील ९५ टक्के विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड झाले असले, तरी पाच टक्के विद्यार्थ्यांचे काम बाकी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या मुलांची आणि आधार न काढलेल्या मुलांची यादी तयार करून येत्या आठ दिवसांत आधार व्हॅलिडेशन पूर्ण करावे, अशी सूचना शिक्षणाधिकारी यांनी दिली.

टॅग्स :JalgaonजळगावEducationशिक्षण