तयारी विजयी जल्लोषाची : फटाके, फुलांना वाढली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:38 AM2019-05-23T00:38:11+5:302019-05-23T00:38:35+5:30

पेढे, मिठाई, गुलालाचीही सज्जता

Preparation: Winners of Victory Increase in demand for fireworks and flowers | तयारी विजयी जल्लोषाची : फटाके, फुलांना वाढली मागणी

तयारी विजयी जल्लोषाची : फटाके, फुलांना वाढली मागणी

Next

जळगाव : लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ रोजी जाहीर होणार असल्याने मतमोजणीसाठी उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते सज्ज झाले असून त्यांच्याकडून विजयी जल्लोषाची तयारीदेखील केली जात आहे. या पार्श्वभूमीवर फटाक्यांना मागणी वाढली असून फूल विक्रेत्यांनी फुलांचीही वाढीव मागणी पाहता त्याची उपलब्धता करून ठेवली आहे. या सोबतच पेढे, मिठाई, गुलालची अधिक विक्री होण्याच्या अंदाजाने दुकानदार सज्ज आहेत.
२३ एप्रिल रोजी जिल्ह्यात जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी मतदान झाल्यानंतर सर्वांना निकालाची उत्सुकता लागलेली आहे. ही उत्सुकता शिगेला पोहचली असताना उमेदवार, कार्यकर्ते यांच्याकडून विजयी जल्लोषाची तयारी केली जात असल्याचे विविध वस्तूंच्या मागणीवरून लक्षात येते. त्यात फटाक्यांना अधिक मागणी असून गेल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यात तालुकास्तरावरील विक्रेत्यांनी फटाक्यांची उपलब्धता करून ठेवण्यासह कार्यकर्त्यांनीही फटाके खरेदी करून ठेवले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या सोबतच २३ रोजी आणखी विक्री होण्यात अंदाज आहे.
या सोबतच विजयी उमेदवारांचे हार, फूल, बुके देऊन स्वागत करण्यासाठीदेखील तयारी केली जात आहे. यासाठी फूल विक्रेत्यांकडे फुलांची नोंदणी करून ठेवली जात आहे. निकालाच्या दिवशी ५० टक्क्याने विक्री वाढण्याचा अंदाज असल्याने फुलांचा अधिकचा साठा मागवून ठेवण्यात आला आहे. एरव्ही शहरात २५ क्विंटल फुलांची विक्री होते. निकालाच्या दिवशी ही विक्री १२ ते १३ क्विंटलने वाढण्याची शक्यता असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
विजयी उमेदवाराचे तोंड गोड करण्यासाठी तसेच विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी समर्थकांकडून पेढे व इतर मिठाईची मागणी वाढण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी उपलब्धता ठेवली आहे.
निवडणूक निकालामध्ये ग्रामपंचायत, न.पा. निवडणुकांच्या निकालानंतर गुलालाचा अधिक वापर होतो. लोकसभा निवडणुकीच्या निकालात याचा जास्त वापर होत नसल्याने विक्रेत्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी मागणीनुसार गुलालाची उपलब्धता असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यापासून फटाक्यांना मागणी असून तालुकापातळीवर विक्रेत्यांनीही त्याची खरेदी केलेली आहे.
- युसुफ मकरा, फटाके विक्रेते.

निकालाच्या पार्श्वभूमीवर फुलांना मागणी वाढणार असल्याच्या अंदाजाने तशी उपलब्धता करून ठेवली आहे.
- मंगला बारी, फूल-हार विक्रेत्या.

निवडणूक निकालासाठी पेढे, मिठाईला मागणी असते. अद्यापपर्यंत मागणी नसली तरी ऐनवेळी मागणी झाल्यास तशी उपलब्धता आहे.
- भाविक मदाणी, मिठाई विक्रेते.

ग्रामपंचायत निवडणुकीवेळी गुलालला मागणी असते. लोकसभा निवडणुकाच्या निकालानंतरही मागणीवाढलीतरउपलब्धताआहे.
- कमलेश सुरतवाला,गुलालविक्रेते.

Web Title: Preparation: Winners of Victory Increase in demand for fireworks and flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव