पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ती गर्भवती असताना तिच्या पोटावर खुंब्याने इजा करुन भृणला जबर इजा पोहोचवून काढण्यास भाग पाडल्याप्रकरणी संतोष दोधा बागूल याला ५ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
गरोदर पत्नीला जबर इजा, पतीला ५ वर्ष शिक्षा
जळगाव : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ती गर्भवती असताना तिच्या पोटावर खुंब्याने इजा करुन भृणला जबर इजा पोहोचवून काढण्यास भाग पाडल्याप्रकरणी संतोष दोधा बागूल (वय २४, धंदा-मजुरी, रा.दहिवद ता.चाळीसगाव) याला न्या.ए.के.पाटणी यांनी ५ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मंगळवारी ३ रोजी हा निकाल झाला. सरकारतर्फे अँड.गोपाळ जळमकर व आरोपीतर्फे अँड.विजय दर्जी यांनी काम पाहिले. आरोपी हा ४ सप्टेंबरपासून कारागृहात असल्याने खटल्याचे कामकाज त्वरेने सुनावणीस आले होते. मेहुणबारे ता.चाळीसगाव येथील माहेरवाशिण पूनम हिच्या लग्नानंतर चार महिने झाल्यावर ९ ऑगस्ट १४ रोजी पती संतोषने तिला ही जबर मारहाण केली होती. २0 ऑगस्टला पूनमने मेहुणबारे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानुसार भारतीय दंड विधान कलम ३१६ (पोटातील गर्भ मारणे), ३२३ (मारहाण करणे)नुसार गुन्हा दाखल झाला होता. ३१६ नुसार ५ आणि ३२३ नुसार १ वर्ष कारावासाची सजा ठोठावण्यात आली. दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. पूनमसह तिची जेठाणी वैजयंताबाई, वडील सुरेश नगराळे, डॉ.अनुराग सोनवणे,पोलीस अधिकारी जयवंत सातव आदी ६ जणांच्या साक्षी झाल्या.
Web Title: Pregnant wife forced to suffer, her husband's 5 years of education