जळगाव जिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञा अभावी महिलेची प्रसूती ताटकळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 12:53 IST2017-11-17T12:52:00+5:302017-11-17T12:53:10+5:30
दोन तास महिलेला वेदना असह्य

जळगाव जिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञा अभावी महिलेची प्रसूती ताटकळली
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 17 - जिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञ हजर नसल्याने प्रसूतीसाठी आलेल्या दिपाली रमेश पाटील (रा. भातखंडे, ता. एरंडोल) महिलेला दोन ते तीन तास ताटकळत रहावे लागल्याने या महिलेचे मोठे हाल झाले.
भातखंडे येथील दिपाली पाटील या महिलेला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला तर दोन ते तीन तास कोणीच लक्ष दिले नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यानंतर या महिलेचे सिङोरियन करावे लागेल, असा सल्ला देण्यात आला. मात्र त्यासाठी भूल देणे आवश्यक होते. मात्र येथे भूलतज्ज्ञच हजर नव्हते. या बाबत विचारणा केली असता ते बोदवड येथून येतात व ते येण्यास चार तास लागतील असे नातेवाईकांना सांगण्यात आले. त्यामुळे महिलेला दुसरीकडे नेण्याचा सल्ला देण्यात आला. तोर्पयत या महिलेला वेदना असह्य झाल्या होत्या. त्यामुळे अखेर नातेवाईकांनी दुस:या रुग्णालयात हलविले. त्यादरम्यान मात्र महिलेला मोठय़ा प्रमाणात वेदना व नातेवाईकांना मानसिक दडपण सहन करावे लागले.
विशेष म्हणजे दुस:या रुग्णालयात या महिलेची सामान्य प्रसूती (नॉर्मल) झाली.