वयाची अट शिथिल करून शिक्षकांना प्राधान्याने लस द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:16 IST2021-03-23T04:16:48+5:302021-03-23T04:16:48+5:30
जळगाव : दहावी - बारावीच्या लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षांना लवकरच प्रारंभ होत आहेत. या परीक्षांशी संबंधित माध्यमिक व ...

वयाची अट शिथिल करून शिक्षकांना प्राधान्याने लस द्यावी
जळगाव : दहावी - बारावीच्या लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षांना लवकरच प्रारंभ होत आहेत. या परीक्षांशी संबंधित माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांना वयाची अट शिथिल करून तत्काळ लस देण्यात यावी, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
येत्या एप्रिल व मे महिन्यात इयत्ता दहावी व बारावीच्या ऑफलाईन परीक्षा, तोंडी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षा शासनाने घेण्याचे धोरण जाहीर केले आहे. येत्या एप्रिलपासून परीक्षेच्या पूर्वतयारीला सुरुवात होणार आहे, अशा वेळेस परीक्षा घेणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्यांचा सहवास लाभणार आहे. या परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव रोखणारी लसीकरण मोहीम शिक्षकांना वयाची अट न टाकता प्राधान्याने द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
लस उपलब्ध करून द्यावी
शहरी व ग्रामीण भागातील नगरपालिका व पीएससी सेंटर व खासगी दवाखान्यांमध्ये लस उपलब्ध करून द्यावी म्हणजे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना परीक्षेपूर्वी लसीकरणाची मोहीम पूर्ण करता येईल, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील सोनार, सरचिटणीस प्रा. शैलेश राणे, कार्याध्यक्ष प्रा. नंदनवन इन्कार, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड व प्रा. डी. डी. पाटील यांनी केली आहे.