थॅलेसेमिया आजार टाळण्यासाठी विवाहपूर्व चाचणी आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:25 IST2020-12-05T04:25:41+5:302020-12-05T04:25:41+5:30
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षाच्या वतीने थॅलेसेमिया आजाराविषयी जनजागृती करण्याबाबत कार्यक्रम इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीत आयोजित करण्यात ...

थॅलेसेमिया आजार टाळण्यासाठी विवाहपूर्व चाचणी आवश्यक
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षाच्या वतीने थॅलेसेमिया आजाराविषयी जनजागृती करण्याबाबत कार्यक्रम इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. रामानंद बोलत होते. मंचावर प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब गलांडे, रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, गनी मेमन आदी उपस्थित होते. यावेळी थॅलेसेमिया विषयी जनजागृती करणाऱ्या पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. प्रसंगी काही रुग्णांची थॅलेसेमिया विषयीची तपासणी करण्यात आली. यावेळी भाऊसाहेब अकलाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.