पीआरसीची तयारी जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST2021-09-23T04:18:40+5:302021-09-23T04:18:40+5:30
पंचायत राजव्यवस्थेत जिल्हापरिषद पंचायत समितीच्या वार्षिक प्रशासनिक अहवालाची तपासणी करणे, मुख्य लेखा परीक्षक आणि स्थानिक लेखा वित्तविषयक लेखा आणि ...

पीआरसीची तयारी जोरात
पंचायत राजव्यवस्थेत जिल्हापरिषद पंचायत समितीच्या वार्षिक प्रशासनिक अहवालाची तपासणी करणे, मुख्य लेखा परीक्षक आणि स्थानिक लेखा वित्तविषयक लेखा आणि लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल तपासणी आदी महत्त्वपूर्ण कामे अखत्यारित असलेल्या पंचायत राज कमिटीचा दौरा म्हणजे जि.प. व पं.स. कर्मचाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारा ठरतो.
२२ सप्टेंबरपासून पंचायत राज कमिटीचा जिल्हा दौरा होता. हा दौरा एक आठवडा पुढे ढकलला गेल्याने, आता समिती २७ ते २९ सप्टेंबरच्या दरम्यान तीन दिवसांसाठी येत आहे.
अनंत चतुर्दशीलाही कर्मचाऱ्यांची हजेरी
पीआरसी येणार म्हणून येथील पंचायत समितीच्या कार्यालयात दप्तर पूर्ततेसाठी धावपळ सुरू आहे. पंचायत समितीच्या विविध विभागांत अगदी अनंत चतुर्दशीलाही कर्मचाऱ्यांची हजेरी होती, तर सध्या रात्री उशिरापर्यंत कर्मचारी कार्यालयात दप्तर पूर्तता करताना दिसून येत आहे.
पं.स. इतिहासात एकदाच पीआरसीची भेट
मुक्ताईनगर तालुका निर्मितीनंतर सत्तरच्या दशकात पंचायत समिती आकारास आली. पंचायत समिती स्थापन झाल्यापासूनच्या इतिहासात एकदाच २०१७ मध्ये येथे पीआरसीचा दौरा झाला. मात्र, दरवेला जिल्ह्यत पीआरसी आली, म्हणजे धावपळ मोठी असते.