शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

प्रतिभाताई पाटील यांचे जीवन कार्यही आता ब्रेल लिपीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:43 PM

चाळीसगाव यथील अंधशाळेतील शिक्षकाने तयार केला सहावा ब्रेल कोलाज

ठळक मुद्दे दीड महिन्याच्या अथक परिश्रमानंतर या कोलाजची निर्मितीउपक्रमाची  राष्ट्रीय पातळीवर दखल

चुडामण बोरसे / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 07-  माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा जीवन कार्याची प्रज्ञाचक्षू विद्याथ्र्यानाही माहिती व्हावी, यासाठी  ‘राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील की जीवनी’ हा हिंदी ब्रेल रुपांतरित कोलाज तयार करण्यात आला आहे. चाळीसगावच्या राष्ट्रीय अंधशाळेतील विशेष शिक्षक सचिन यशवंतराव सोनवणे यांनी दीड महिन्याच्या अथक परिश्रमानंतर या कोलाजची निर्मिती केली आहे.  ब्रेेल लिपीत तयार केलेला त्यांचा हा सहावा कोलाज आहे.  प्रतिभाताई पाटील यांचे प्राथमिक शिक्षण चाळीसगाव येथे झाले आहे. आमदार ते राष्ट्रपती असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे. त्यांचे बालपण, महाविद्यालयीन जीवन आणि राजकीय कार्यकाळाची माहिती  संकलित करण्यात आली. त्यानंतर या माहितीचे ब्रेल लेखन पाटीवर कोलाज तयार करण्यात  आले.  यासाठी शिक्षक सोनवणे यांनी तब्बल दीड महिना कठोर मेहनत घेतली. यानंतर पुण्यातील सामाजिक कार्यकत्र्या राखी रासकर यांच्याशी संपर्क साधून प्रतिभाताईंर्पयत या कोलाजची माहिती पोहचवली. याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही या ब्रेेल कोलाजचे प्रकाशन करण्यास संमती दिली. 25 डिसेंबर रोजी झालेल्या  ब्रेल कोलाजच्या प्रकाशनला आमदार मोहन  जोशी,  राखी रासकर, निवेदिका मेघना झुझम, गजश्री सोनवणे  उपस्थित होते.   ब्रेल कोलाज हे प्रज्ञाचक्षू तरुण- तरुणींच्या   जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य करेल आणि या उपक्रमाची  राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जावी, अशी अपेक्षा  प्रतिभाताई पाटील यांनी मनोगतात व्यक्त केली.    प्रतिभाताई यांच्या राजकीय जीवनाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल  ‘मातृतुल्य आदरणीय प्रतिभाई’ हे कवितारुपी मानपत्र  सचिन  यांच्या पत्नी  गजश्री सोनवणे यांनी सादर केले. सचिन सोनवणे यांनी आतार्पयत पु.ल. देशपांडे लिखित ‘बटाटय़ाची चाळ‘, तिरुपती दर्शन - हिस्ट्री व अल्बम, बहिणाबाईंची जीवन कहाणी, अब्राहम लिंकनचे मुख्याध्यापकास पत्र आणि कुसुमाग्रजांची ‘कणा’ आणि ‘जालियनवाला बाग’ या कवितेचाही ब्रेल लिपित कोलाज केला आहे. 

प्रतिभाताईंनी  वेगळा इतिहास घडविला आहे. त्यांची माहिती प्रज्ञाचक्षू विद्याथ्र्याना कळावी,  हा दृष्टीकोन समोर ठेवून प्रतिभाताई पाटील की जीवनी हा हिंदी ब्रेल रुपांतरित कोलाज तयार केला आहे. - सचिन सोनवणे, शिक्षक, चाळीसगाव जि. जळगाव.