प्रगती पुस्तक न देण्याचा शिक्षकाचा प्रताप

By Admin | Updated: December 4, 2014 15:00 IST2014-12-04T15:00:31+5:302014-12-04T15:00:31+5:30

विद्यार्थ्यांना प्रथम सत्राचे प्रगतीपुस्तक मिळाले नसल्याचे दिसून आले. शाळेतील इतरही कागदपत्रे अपूर्ण होती. त्यामुळे या शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकाला जागेवरच नोटीस देण्यात आली.

Prateep of not giving a book to progress | प्रगती पुस्तक न देण्याचा शिक्षकाचा प्रताप

प्रगती पुस्तक न देण्याचा शिक्षकाचा प्रताप

कामात कसूर : शिक्षक, मुख्याध्यापकांना नोटीस

 
जळगाव : शिक्षणाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तेजराव गाडेकर यांच्यासह त्यांच्या पथकाने जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील जि.प. शाळेला बुधवारी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रथम सत्राचे प्रगतीपुस्तक मिळाले नसल्याचे दिसून आले. शाळेतील इतरही कागदपत्रे अपूर्ण होती. त्यामुळे या शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकाला जागेवरच नोटीस देण्यात आली. त्यांच्याकडून खुलासा आल्यानंतर निलंबनाची कार्यवाही करण्यात येणार आहे. 
जि.प. शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. अशी ओरड पालकांकडून नेहमी होते. मात्र, या शाळांवर कोणाचा 'वॉच' राहिलेला नसल्यामुळे जि.प. शाळेत अनागोंदी कारभार सुरू असल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्याचीच प्रचिती बुधवारी बेटावद खुर्द (जामनेर) येथील जि.प. प्राथमिक शाळेत गेल्यानंतर अधिकार्‍यांना दिसून आली. शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर, विस्तार अधिकारी विजय पवार व खलील शेख यांनी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांना प्रथम सत्राचे प्रगती पुस्तक मिळाले नसल्याचे समजले. 
मिरची मुदतबाह्य 
मुदतबाह्य शालेय पोषण आहाराचा विषय गाजत असताना शिक्षणाधिकार्‍यांना या शाळेत मिरचीचा साठा मुदतबाह्य असल्याचे आढळून आले. याबाबत मुख्याध्यापक आर. एस. साळुंखे यांना विचारणा केली. मात्र, त्यात तथ्य दिसले नाही. त्यामुळे गाडेकर यांनी शिक्षणाधिकारी साळुंखे व शिक्षक राजपूत यांना नोटिसा दिल्या आहेत.
----------
जि.प. शाळांविषयी अनेक तक्रारी आहे. आता दररोज शाळांची तपासणी करण्यात येणार आहे. शाळांमधील कागदपत्रे अपडेट ठेवणे गरजेचे आहे. तसे न दिसल्यास कारवाई करण्यात येईल असे प्राथमिक शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांनी सांगितले. 

Web Title: Prateep of not giving a book to progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.