प्रतापच्या प्राचार्या डॉ. ज्योती राणे यांचा मुदतपूर्व राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:13 IST2021-06-25T04:13:47+5:302021-06-25T04:13:47+5:30

प्राचार्य पदासाठी वयाची अट ६२ वर्षे असते. डॉ. ज्योती राणे यांची अद्याप दोन वर्षे बाकी आहेत. मात्र वैयक्तिक तब्येतीच्या ...

Pratap's principal Dr. Jyoti Rane's premature resignation | प्रतापच्या प्राचार्या डॉ. ज्योती राणे यांचा मुदतपूर्व राजीनामा

प्रतापच्या प्राचार्या डॉ. ज्योती राणे यांचा मुदतपूर्व राजीनामा

प्राचार्य पदासाठी वयाची अट ६२ वर्षे असते. डॉ. ज्योती राणे यांची अद्याप दोन वर्षे बाकी आहेत. मात्र वैयक्तिक तब्येतीच्या कारणावरून त्यांनी प्राचार्य पद सोडण्याचा निर्णय घेऊन संचालक मंडळाला लेखी दिले आहे. प्राचार्या राणे यांच्या कार्यकाळात ‘नॅक’चा ए प्लस दर्जा मिळाला होता. २०१८ मध्ये स्वायत्तता दर्जा मिळाला होता. रुसामध्ये निवड झाली होती. ऑल इंडिया रँकिंग मध्ये प्रताप महाविद्यालयाचा क्रमांक ५८ होता तर महाराष्ट्रात १६ वा होता. विद्यापीठाच्या मूल्यांकनात प्रताप महाविद्यालयाला ८८ गुण मिळून प्रथम क्रमांक आला होता. मात्र प्राचार्य पद सोडताच प्राध्यापक म्हणून त्यांना वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त व्हावे लागते. म्हणून त्यांनी १० जुलै रोजी प्राध्यापक पद देखील सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान खान्देश शिक्षण मंडळाची मुदत संपली असून आगामी काळात केव्हाही निवडणूक लागू शकते. अशा परिस्थितीत प्राचार्यांनी पद सोडण्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रा. शिरोडे, प्रा. ए. बी. जैन, प्रा. जयेश गुजराथी आदींची नावे स्पर्धेत असल्याचे कळते.

Web Title: Pratap's principal Dr. Jyoti Rane's premature resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.