प्रशांत कोल्हे यांनी केली क्रीडा प्रशिक्षकांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:17 IST2021-05-21T04:17:55+5:302021-05-21T04:17:55+5:30

जळगाव : सध्या कोरोनाच्या काळात मैदाने बंद आहेत, त्यामुळे क्रीडा प्रशिक्षण वर्ग देखील बंद आहे. अशा काळात क्रीडा प्रशिक्षकांना ...

Prashant Kolhe helped the sports coaches | प्रशांत कोल्हे यांनी केली क्रीडा प्रशिक्षकांना मदत

प्रशांत कोल्हे यांनी केली क्रीडा प्रशिक्षकांना मदत

जळगाव : सध्या कोरोनाच्या काळात मैदाने बंद आहेत, त्यामुळे क्रीडा प्रशिक्षण वर्ग देखील बंद आहे. अशा काळात क्रीडा प्रशिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातील सात क्रीडा प्रशिक्षकांना असोदा येथील सार्वजनिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रशांत कोल्हे यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांनी या प्रशिक्षकांना प्रत्येकी ५० किलो गहू, २० किलो तांदूळ आणि पाच किलो तूरदाळ मदत दिली आहे.

गुरुवारी जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली. यावेळी जिल्हा शारीरीक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, सचिव राजेश जाधव, उपाध्यक्ष योगेश सोनवणे, जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ.रणजित पाटील,सचिव प्रा. हरिश शेळके यांच्या उपस्थितीत मदतीचे कुपन देण्यात आले.

Web Title: Prashant Kolhe helped the sports coaches