प्रसाद म्हणून गुंगीचे पदार्थ खायला देवून जळगावातून तरुणीला पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 22:55 IST2017-12-16T22:51:17+5:302017-12-16T22:55:51+5:30
प्रसाद म्हणून गुंगीचा पदार्थ खायला देत चोवीस वर्षीय तरुणीला पळवून नेऊन नेणाºया वसीम उर्फ मद्दसर युसुफ खान (वय २१ रा. तांबापुरा, जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून पीडित मुलीच्या तक्रारीवरुन त्याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या तरुणीला पळवून लावण्यात मदत केल्याप्रकरणी अंजुम सय्यद (रा.तांबापुरा, जळगाव) हिच्याविरुध्दही गुन्हा दाखल झाला असून ती फरार आहे.

प्रसाद म्हणून गुंगीचे पदार्थ खायला देवून जळगावातून तरुणीला पळविले
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, १६ : प्रसाद म्हणून गुंगीचा पदार्थ खायला देत चोवीस वर्षीय तरुणीला पळवून नेऊन नेणाºया वसीम उर्फ मद्दसर युसुफ खान (वय २१ रा. तांबापुरा, जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून पीडित मुलीच्या तक्रारीवरुन त्याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या तरुणीला पळवून लावण्यात मदत केल्याप्रकरणी अंजुम सय्यद (रा.तांबापुरा, जळगाव) हिच्याविरुध्दही गुन्हा दाखल झाला असून ती फरार आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, १२ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता अंजुम सैयद हिने तांबापुरा भागातील पिरबाबा दर्ग्याजवळ पीडित तरुणीला प्रसाद म्हणून काही तरी खायला दिले. त्यात पीडित तरुणी शुध्द हरपली. त्याचा फायदा घेत वसीम खान याने पीडित तरुणीला पळवून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार वसीम व अंजुम सय्यद या दोघांविरुध्द कलम ३६६ नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी संशयिताचा शोध घेवून पीडित तरुणीला ताब्यात घेतले. वसीम याने दोन दिवसाच्या कालावधीत औरंगाबाद येथे मित्राच्या दुकानात बलात्कार केल्याची तक्रार पीडित तरुणीने दिल्याने वसीम याच्याविरुध्द शनिवारी बलात्काराचे वाढीव कलम लावण्यात आले.
दरम्यान, वसीम याला पोलिसांनी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्या.बी.डी.गोरे यांनी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड.निखिल कुळकर्णी यांनी काम पाहिले. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस आता औरंगाबादला जाणार आहेत. मदत करणाºया अंजुम हिचाही शोध सुरु असून तिच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे.