बेशुद्धावस्थेत आढळलेल्या मोराचे वाचविले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:04 IST2019-07-14T00:04:00+5:302019-07-14T00:04:09+5:30

अमळनेर : बोरी नदीच्या काठावर असलेल्या फापोरे बुद्रूक येथील काही तरूण व्यायाम करीत असताना त्यांना मोर बेशुद्ध अवस्थेत आढळला. ...

Prana survived the peacock found in unconsciousness | बेशुद्धावस्थेत आढळलेल्या मोराचे वाचविले प्राण

बेशुद्धावस्थेत आढळलेल्या मोराचे वाचविले प्राण



अमळनेर : बोरी नदीच्या काठावर असलेल्या फापोरे बुद्रूक येथील काही तरूण व्यायाम करीत असताना त्यांना मोर बेशुद्ध अवस्थेत आढळला. हा प्रकार १३ जुलै रोजी संध्याकाळी घडला.
याबाबत तरुणांनी तत्काळ त्यास पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.तळेकर, डॉ.पी.ए.पाटील व युवराज पाटील यांना संपर्क करून घटनास्थळी बोलविले. त्यांनी मोरावर उपचार करून वनपाल बोरसे यांच्याकडे सोपविले. याकामी भूषण पाटील, संदीप पाटील, प्रीतेश पाटील, विकी पाटील, दिनेश पाटील यांनी सहकार्य केले.

Web Title: Prana survived the peacock found in unconsciousness