पारोळ्यात शिक्षक पतपेढीतर्फे गुणगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST2021-09-03T04:16:28+5:302021-09-03T04:16:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पारोळा : विद्यार्थी दशेत मुलांना चांगले वाईट कळले पाहिजे. तो एक सुसंस्कृत नागरिक घडण्यासाठी त्यावर ...

पारोळ्यात शिक्षक पतपेढीतर्फे गुणगौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : विद्यार्थी दशेत मुलांना चांगले वाईट कळले पाहिजे. तो एक सुसंस्कृत नागरिक घडण्यासाठी त्यावर चांगले संस्कार पालकांनी बिंबविले पाहिजे. मुलांना चांगला नागरिक घडविण्यासाठी शिक्षक व पालकांनी नेहमी प्रयत्न केले पाहिजे. मेहनतीला शिस्तीची जोड दिल्यास यश तुमच्या पायावर लोटांगण घालेन. शेवटी स्पर्धेत टिकण्यासाठी स्वतःला सिद्ध करावेच लागणार आहे, असे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढीच्या वतीने पारोळा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांच्या गौरवप्रसंगी हरिनाथ मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षक स.ध.भावसार, गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे, पतपेढीचे अध्यक्ष शालिग्राम भिरुड, सचिव मनोहर सूर्यवंशी, खजिनदार निंबा पाटील, संचालक गजानन गव्हारे, अजय देशमुख, नंदकुमार पाटील, व्ही. टी. पाटील, आर. डी. चौधरी, जुनी पेन्शन योजनेचे डॉ. शांताराम पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माने आदी उपस्थित होते.
यावेळी विशेष प्रावीण्य मिळालेल्या सभासद पाल्यांचा चांदीचे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी स.ध. भावसार यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षण मूल्य राबविणे खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कविता सुर्वे यांनी यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरून शाब्बासकीची थाप मिळाल्यावर त्यांच्या यशाच्या पंखांना अधिक बळ मिळते, असे सांगितले.
प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष शालिग्राम भिरुड यांनी, तर सूत्रसंचालन व आभार संचालक नंदकुमार पाटील यांनी मानले.