रक्तदान दिनानिमित्त रक्तदात्यांचा गुणगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:23 IST2021-06-16T04:23:34+5:302021-06-16T04:23:34+5:30
व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष किरण पाटील, सचिव अभय आखाडे, कोषाध्यक्ष प्रीतम टाक उपस्थित होते. ...

रक्तदान दिनानिमित्त रक्तदात्यांचा गुणगौरव
व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष किरण पाटील, सचिव अभय आखाडे, कोषाध्यक्ष प्रीतम टाक उपस्थित होते.
आजच्या या धावपळीच्या जीवनात कोणी कोणासाठी वेळ देत नाही; पण या दात्यांनी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता इतर रुग्णांचे प्राण वाचवण्याचे कार्य केले. अशा दात्यांच्या कार्याची दाखल घेत आई फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून रक्तदात्यांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी त्यांना प्रमाणपत्र, वृक्ष व टोपी देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला, तसेच भुसावळातील काही सोशल मीडियावरील ग्रुप ॲडमिन व त्यांच्या ग्रुपमधील सदस्य जे नेहमी दर तीन-चार महिन्यांनंतर रक्तदान करतात अशा दात्यांचा सत्कार करण्यात आला. संजीवनी ब्लड ग्रुपचे ॲडमिन सागर विसपुते, रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपचे ॲडमिन राहुल सोनवणे, भुसावळ रक्तदाते ग्रुप व तसेच शेख अबीद, किरण पाटील, प्रकाश चौधरी, भूपेंद्र गोदाने, सन्नी रमानी, तनीष भोसले, नितीन ठाकरे, केतन इंगळे, योगेश फालक, नितीन बोरसे, अनिल पीसोट यांचा सत्कार करण्यात आला. संजीवनी ब्लड ग्रुपचे ॲडमिन सागर विसपुते, रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपचे ॲडमिन भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन अभय आखाडे यांनी, राहुल सोनवणे व किरण पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. केतन इंगळे, जयदेव मोरे , अरविंद थोरात, योगेश कोलते, किरण गव्हाळे, नरसिंघ तायडे, योगेश बागुल, गणेश कोळी, सोनी ठाकूर उपस्थित होते.