‘प्रहार’ची आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:35 IST2021-09-02T04:35:43+5:302021-09-02T04:35:43+5:30
भुसावळ : प्रहार जनशक्ती पक्षाची जळगाव जिल्हा आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. लोकसेवेचा पाया मजबूत ...

‘प्रहार’ची आढावा बैठक
भुसावळ : प्रहार जनशक्ती पक्षाची जळगाव जिल्हा आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. लोकसेवेचा पाया मजबूत केल्यास पक्ष मजबूत होईल, असे गावंडे यांनी सांगितले.
व्यासपीठावर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, जिल्हाध्यक्ष विजय भोसले, सुधाकर खुमकर, युवक जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, ॲड. नंदिनी चौधरी, राजश्री नेवे, जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आदी मान्यवर हजर होते.
अनिल चौधरी यांच्या पक्ष प्रवेशामुळे जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाला बळकटी प्राप्त झाली असल्याचे मत युवक जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी आढावा बैठकीत व्यक्त केले.
भुसावळ झालेल्या आढावा बैठकीबाबतीत बोलत असताना प्रहार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरेंनंतर जो नेता आवडला असेल त्याच नाव बच्चू कडू, संघटनात्मक बांधणी या विषयावर मार्गदर्शन केले. तळागळातील कार्यकर्ता हाच प्रहार पक्षाची खरी ताकद आहे, प्रहार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता समर्थ आणि सक्षम व्हावा म्हणून आपला प्रयत्न राहिला पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण चौधरी यांनी केले.