जामनेर संजय गांधी समिती अध्यक्षपदी प्रदीप लोढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST2021-08-22T04:19:34+5:302021-08-22T04:19:34+5:30

जामनेर : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी पहूर येथील जि.प.चे माजी कृषी ...

Pradip Lodha as the Chairman of Jamner Sanjay Gandhi Committee | जामनेर संजय गांधी समिती अध्यक्षपदी प्रदीप लोढा

जामनेर संजय गांधी समिती अध्यक्षपदी प्रदीप लोढा

जामनेर : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी पहूर येथील जि.प.चे माजी कृषी सभापती तथा राष्ट्रवादीचे प्रदीप लोढा यांची नियुक्ती झाली.

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर या समितीत बदल होणार हे निश्चित होते; मात्र समितीचे अध्यक्षपद आघाडीतील कोणत्या घटक पक्षाकडे जाते याची उत्सुकता होती. अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक असल्याने नियुक्ती लांबली. अखेर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शिफारशीनंतर जिल्हाधिकारी यांनी समिती जाहीर केली. समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.

सदस्य - दीपक सुरळकर (शेंदुर्णी), प्रियांका सुरवाडे (जामनेर), मुलचंद नाईक (खडकी), अतुल सोनवणे (जामनेर), नीळकंठ पाटील (शेळगाव), अकिलखा पठाण (सोनारी), सुनील काळभिले (तोंडापूर), यशवंत पाटील (वाकी बुद्रुक), बाबूराव पाटील, (नांद्रा प्रलो), गटविकास अधिकारी व सचिव तहसीलदार.

नवनियुक्त अध्यक्ष लोढा हे पहुरपेठचे माजी सरपंच आहे.

Web Title: Pradip Lodha as the Chairman of Jamner Sanjay Gandhi Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.