शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

असाध्य ते साध्य करीता सायास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 21:23 IST

सामान्य कुटुंबात जन्मलेले तुकोबाराय सतत साधनेच्या बळावर ‘आकाशा एवढे’ बनू शकले आणि चोखाबारायांना पांडुरंगाने आपल्या पायरीशी जागा दिली.

संतांनी केवळ निवृत्ती मार्गाची शिकवण समाजाला दिली नाही, तर प्रयत्नवादाचेही संस्कार मराठी मनावर केले आहेत. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे असे आपण म्हणतो. त्यासाठी सातत्याच्या प्रयत्नांची गरज आहे. अभ्यासाची आवश्यकता आहे. ज्ञानदेव महाराज देखील सांगतात. ‘‘म्हणौनि अभ्यासासी काही । सर्वथा आन नाही । या लागी तु माझ्या ठायी । अभ्यास मिळे ।। प्रपंच करताना जसा अभ्यास आवश्यक आहे तसा परमर्थातही अभ्यास आवश्यक आहे. अभ्यासाने विष पचवता येते. अभ्यासाने व्याघ्र सर्पादी प्राणी वशीभूत करता येतात. असाध्य ते साध्य करीता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।। अशा शब्दात अभ्यासाचा म्हणजेच प्रयत्नवादाचा महिमा तुकोबाराय सांगतात.प्रयत्न करत असताना खचून जाण्याचे, अपयशाच्या संभावनेचे क्षण कदाचित येतील ही पण त्यावेळी प्रयत्न सोडून न देता आपली साधना अविरत सुरू ठेवली पाहिजे. होणार नाही, जमणार नाही, असे या जगात काहीच नाही. ‘नव्हे ऐसे काही नाही अवघड’ हा तुकोबारायांचा सिद्धांत आहे. तो पटवून सांगण्यासाठी त्यांनी काही दृष्टांत दिले आहेत. खडक भेदून झाड वाढलेले आपल्याला दिसते. ऐन उन्हाळ्यातही हिरवे गार दिसते. त्यासाठी त्याची कोवळी लुसलुशीत मुळे ओल शोधण्यासाठी सतत खडकाशी झटत असतात. थोडी वाट मिळाली तरी त्यात अलगद प्रवेश करून पुढे जातात. मग त्या खडकाला दुभंगुन आपल स्थान निर्माण करतात. दोर हा काही चिरा कापण्याचे साधन नाही पण मोटेचा खालचा दोर सतत दगडाला घासून विहिरीवरच्या पाण्याच्या थाळण्याचा तो दगड चिरल्यासारख खाचा पडून झिजून जातो. मातेच्या उदरात बाळासाठी स्वतंत्र जागा कुठे असते? तरी तो इवलासा जीव दिसामासांनी वाढत जाऊन त्या उदरात जागा निर्माण करतोच ना! या सर्व गोष्टी सातत्याच्या प्रयत्नांनीच साध्य होतात. महाराष्ट्राचे माऊंटन मॅन म्हणून ओळखले जाणारे राजाराम भापकर गुरूजी यांनी गुंडेगाव ता.नगर या डोगरांनी वेढलेल्या गावात शासनाची दमडीही न घेता कधी श्रमदानाने तर कधी पदरमोड करून रस्त्यांची निर्मिती करतात. त्यासाठी चाळीस वर्षे आपला अर्धा पगार, निवृत्तीनंतरची सर्व रक्कम आणि पुरस्कारांची रक्कम खर्च सततच्या प्रयत्नांतून ४० कि.मी.रस्त्यांची बांधणी करतात. जिथे सायकलही जाऊ शकत नव्हती. त्या रस्त्यावरून एस.टी.धावू लागते हे प्रयत्नवादाचे फलित आहे. ८६ वर्षाचे भापकर गुरूजींचे उदाहरण आपल्यासमोर आहे. सामान्य कुटुंबात जन्मलेले तुकोबाराय सतत साधनेच्या बळावर ‘आकाशा एवढे’ बनू शकले आणि चोखाबारायांना पांडुरंगाने आपल्या पायरीशी जागा दिली. पांडुरंगाच्या दर्शनाआधी चोखोबांच्या समाधीला केलेला नमस्कार हा प्रयत्नवादाला नमस्कार असतो. साधनेला वंदन असते.- प्रा. सी.एस.पाटील, धरणगाव.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव