‘प्रभारीराज’मुळे विकासकामांना ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:02+5:302021-07-18T04:13:02+5:30
सामनेर येथील ग्रामविकास अधिकारी आर. एन. सोनवणे हे एक महिन्यापूर्वी निवृत्त झाले, तेही प्रभारी म्हणून त्यांच्याकडे कार्यभार दिला होता. ...

‘प्रभारीराज’मुळे विकासकामांना ब्रेक
सामनेर येथील ग्रामविकास अधिकारी आर. एन. सोनवणे हे एक महिन्यापूर्वी निवृत्त झाले, तेही प्रभारी म्हणून त्यांच्याकडे कार्यभार दिला होता. त्यांच्या जागेवर वाय. पी. अडांगळे यांची ग्रामविकास अधिकारी म्हणून दोन महिन्यांसाठी प्रभारी म्हणून देण्यात आले. याअगोदर ग्रामविकास हेसुद्धा प्रभारी होते. त्यांच्याही कार्यकाळात चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाची कामे झाली नाहीत, तीच परिस्थिती आताच निर्माण झाली आहे.
प्रभारी कर्मचारी असल्यामुळे पाहिजे, तसे विकासकामांकडे लक्ष दिले जात नाही. त्याचपद्धतीने तलाठी यांच्याकडेही सामनेर हे गाव प्रभारी म्हणून देण्यात आले आहे. सामनेर गावाला आरोग्य सेवक जागा रिक्त आहे. त्यामुळे एकंदरीत सामनेर गावाचा विकास हा केवळ प्रभारीराजमुळे अडकलेला दिसतो, तरी यासंदर्भात ग्रामपंचायतीच्यावतीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबतीत पाठपुरावा करूनही पाहिजे तशी कारवाई झाली नाही. तरी येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर पूर्णवेळ कर्मचारी देण्यात आले नाहीत, तर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या एक ते दीड वर्षापासून सामनेर गावाला ग्रामविकास अधिकारी हे प्रभारी असल्यामुळे गावाची विकासकामे थांबलेली आहेत. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर सामनेर गावासाठी पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी देण्यात यावे, अन्यथा सर्व पदाधिकारी उपोषणाला बसतील.
- बाळकृष्ण पाटील, उपसरपंच, सामनेर, ता. पाचोरा
तालुक्यात बऱ्याच ठिकाणी ग्रामसेवक पदे रिक्त आहेत. या ठिकाणी पूर्णवेळ ग्रामसेवक देण्याचा प्रयत्न करू.
- अतुल पाटील, गटविकास अधिकारी, पाचोरा