शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची जोरदार खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 13:17 IST

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाजारपेठ फुलली

ठळक मुद्देएसीला सर्वाधिक मागणीवाहन बुकिंग जोरात

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १६ - साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गु गुढीपाडव्याढीपाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी विविध वस्तूंच्या खरेदी करण्यासाठी बाजारात गुरुवारी मोठी गर्दी होती. दुचाकी, कार, ए.सी. एलईडी, फ्रीज यांना सर्वाधिक मागणी आहे तर वॉशिंग मशिन, ओव्हन यांना त्या खालोखाल मागणी आहे. पाडव्याच्या दिवशी नवीन ९०० दुचाकी व १०० चारचाकी वाहने विक्री होण्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला आहे. पाडव्यासाठी हार- कंगन यांच्याही खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे फुले मार्केट, गोलाणी मार्केट परिसर गर्दीने फुलला होता.वाहन बुकिंग जोरातहिंदू नववर्षाला विविध वस्तू खरेदीला मोठे महत्त्व दिले जाते. त्यानुसार पाडव्याला मनाजोगे वस्तू मिळावी म्हणून गेल्या आठवड्यापासूनच बुकिंग केले जात आहे. यात बुधवार, गुरुवारी तर आणखी भर पडली. शहरातील दुचाकीच्या एकाच दालनात गुरुवारपर्यंत २५०हून अधिक दुचाकींचे बुकिंग झालेले होते. त्यात शुक्रवार, शनिवार आणखी भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला ९०० दुचाकींची विक्री होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.चारचाकींनाही मागणीचारचाकी वाहनांनाही चांगली मागणी असून त्यांचेही बुकिंग केले जात आहे. पाडव्याला १००पेक्षा अधिक चारचाकी विक्री होण्याचा अंदाज वर्तविला आहे.एसीला सर्वाधिक मागणीइलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्याही बाजारात रेलचेल असून यंदा एसीला सर्वाधिक मागणी आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर यंदा ३५०हून अधिक एसी विक्री होईल, असा विश्वास विक्रेत्यांनी व्यक्त केला. या सोबतच एलईडी, फ्रिज यांना मागणी असून त्या खालोखाल वाशिंग मशिन, ओव्हनला मागणी आहे. यंदा तर कंपन्यांनी मोठ्या एलईडीवर छोटा एलईडी, मोठ्या फ्रिजवर छोटा फ्रिज दिला जात असल्याने खरेदीस चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.होळी प्रमाणे गुढीपाडव्यालाही हार कंगन ला महत्त्व आहे़ यासाठी यंदादेखील विक्रेत्यांनी विविध प्रकारचे हार-कंगन बनविले आहेत़ १०० ते १२० रुपये किलो असा बाजारभाव असून त्यांना मागणी आहे.गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दुचाकींना चांगली मागणी असून बुकिंगही जोरात सुरू आहे.- अमित तिवारी, महाव्यवस्थापक.यंदा एसीला सर्वाधिक मागणी असून त्या खालोखाल एलईडी, फ्रिज यांची विक्री होत आहे. कंपन्यांनी विविध आॅफर्स दिल्याने त्याचाही ग्राहक लाभ घेत आहे.- दिनेश पाटील, विक्रेते.

टॅग्स :gudhi padwaगुढी पाडवाJalgaonजळगाव