शिवाजी नगरात १८ तासांनी वीज पुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:17 IST2021-09-18T04:17:43+5:302021-09-18T04:17:43+5:30
या भागात घरगुती वीज जोडणीची केबल खाली आल्यामुळे, गुरूवारी सायंकाळी एका माल वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या छताच्या भागात या ...

शिवाजी नगरात १८ तासांनी वीज पुरवठा सुरळीत
या भागात घरगुती वीज जोडणीची केबल खाली आल्यामुळे, गुरूवारी सायंकाळी एका माल वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या छताच्या भागात या केबलची वायर अटकली होती. रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकच्या छतात ही वायर अटकल्यामुळे, ही केबल ओढली गेली आणि परिणामी विद्युत खांबही ओढला जाऊन तो खांब थेट ट्रकच्या दिशेने कोसळला होता. मात्र, ट्रकवरील चालकाला हा प्रकार लक्षात आल्यानंतर, त्यांनी तात्काळ जागेवरच ट्रक उभा केला. यावेळी परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन, तात्काळ हा वीज पुरवठा खंडित करीत वाकलेल्या खांब्याखालुन ट्रक बाजूला केली होती. दरम्यान, या प्रकारामुळे या भागातील विज पुरवठा रात्रभर खंडित होता.
इन्फो :
तब्बल १८ तासांनी झाला विज पुरवठा सुरळीत
दरम्यान, विज खांब कोसळल्यानंतर अनेक ठिकाणच्या तारा व घरगुती जोडणीच्या केबल पूर्णपणे तुटून पडल्या होत्या. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच हे काम हाती घेतले असते, तर काम होईपर्यंत संपुर्ण शिवाजीनगरातल विज पुरवठा खंडित करावा लागणार होता. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी हे काम हाती घेऊन, दुपारी बारापर्यंत या भागातील विज पुरवठा सुरळीत केला. तसेच या भागात नेहमी व्यापाऱ्यांच्या माल वाहतूक करणाऱ्या ट्रकची वाहतूक सुरू राहत असल्यामुळे, घरगुती केबल ५० फुटहून अधिक उंचीवर ठेवण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.