‘ब्लॅक आऊट’ उपक्रमातून विजेची बचत

By Admin | Updated: October 3, 2015 00:19 IST2015-10-03T00:19:27+5:302015-10-03T00:19:27+5:30

नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी वॉर्डात अर्धातास ब्लॅक आऊटचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. गांधी जयंतीला महाबळ परिसरातील 100 ते 150 कुटुंबीयांनी वीज बचतीची शपथ घेतली.

Power saving from 'Black Out' | ‘ब्लॅक आऊट’ उपक्रमातून विजेची बचत

‘ब्लॅक आऊट’ उपक्रमातून विजेची बचत

जळगाव : विजेचा वापर कमी व्हावा व त्याद्वारे पर्यावरणाचे संवर्धन व्हाव़े शेतक:यांना वीज उपलब्ध व्हावी़ राष्ट्रभक्तीला हातभार लागावा यासाठी नगरसेविका अश्विनी विनोद देशमुख यांनी आपल्या वॉर्डात अर्धातास ब्लॅक आऊट (विजेचा वापर बंद) करण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीला महाबळ परिसरातील 100 ते 150 कुटुंबीयांनी वीज बचतीची शपथ घेतली आणि उपक्रमात सहभागी होणाचा संकल्प केला.

यावेळी महापौर राखी सोनवणे, उपमहापौर सुनील महाजन, महावितरणचे मुख्य अभियंता ज़ेएम़ पारधी, आस्थापना प्रमुख राजेंद्र म्हंकाळे, विनोद देशमुख उपस्थित होत़े रामदास मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला़

संपूर्ण शहरात राबविणार उपक्रम

या संकल्पनेचा नागरिकांमध्ये प्रचार आणि प्रसार होईल, तसतसा हा उपक्रम संपूर्ण शहरातही राबविला जाणार असल्याची माहिती नगरसेविका देशमुख यांनी दिली़ नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन राष्ट्रसेवेला हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले आह़े

या भागात राबविला जाणार उपक्रम

महाबळ परिसरात हा उपक्रम शुक्रवारपासून राबविण्यास सुरुवात झाली़ त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला़ पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र बँक कॉलनी, नेहरू नगर, मोहन नगर आणि संभाजी नगर परिसरात हा उपक्रम राबविला जात आह़े 100 ते 150 कुटुंबीयांनी यात सहभाग घेतला़

600 ते 700 रुपयांची प्रतिदिन होणार वीज बचत

वार्ड क्रमांक 36 मध्ये 1 हजार 200 ते 1 हजार 300 घरे आहेत़ पैकी 150 कुटुंबीयांनी बचतीची शपथ घेतली आह़े त्यांच्याकडून अर्धातास ब्लॅक आऊट करण्यात आल्यास प्रतिदिन त्यांच्याकडून जवळपास 600 ते 700 रुपयांची वीज बचत होईल़ महिनाभरात 18 हजार रुपयांची वीज त्यांच्याकडून बचत केली जाऊ शकत़े 10 हजार नागरिक यात सहभागी झाल्यास प्रतिदिन जवळपास 40 हजारांच्या विजेची त्यांच्याकडून बचत शक्य असल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एऩबी़ चौधरी यांनी सांगितल़े

सर्वप्रथम या भागातील रहिवाशांना अश्विनी व विनोद देशमुख यांनी समजून सांगितली. त्यांना हा उपक्रम आवडल्याने त्यांनी होकार दिल्याने गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

अशी आहे संकल्पना

दररोज रात्री 8 ते 8़30 र्पयत घरातील विद्युत पुरवठा बंद ठेवून अर्धातास फक्त कुटुंबासोबत घालवायचा

यामुळे कुटुंबातील सदस्यांचा तुटलेला संवाद पुन्हा जुळून येईल आणि नातेसंबंध दृढ होतील

विजेचा वापर कमी होऊन विजेची बचत होईल़ परिणामी वीज बिलही कमी होईल़ अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रसेवेला नागरिकांचा हातभार लागेल़

वीज शिल्लक राहिल्यास ती शेतक:यांना पुरविली जाईल़ यामुळे कृषि उत्पादनात वाढ होऊन शेतकरी समृद्ध होतील़

Web Title: Power saving from 'Black Out'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.