पिंप्राळ्यात सलग आठ तास वीज गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:16 IST2021-03-23T04:16:46+5:302021-03-23T04:16:46+5:30

जळगाव : एककीडे उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले असताना पिंप्राळ्यात शुक्रवारी रात्री सलग आठ तास वीजपुरवठा खंडित होता. परिणामी, ...

Power outage for eight hours in a row in Pimpri | पिंप्राळ्यात सलग आठ तास वीज गूल

पिंप्राळ्यात सलग आठ तास वीज गूल

जळगाव : एककीडे उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले असताना पिंप्राळ्यात शुक्रवारी रात्री सलग आठ तास वीजपुरवठा खंडित होता. परिणामी, रात्रीच्या उकाड्यामुळे नागर‍िकांचे प्रचंड हाल झाले.

दुपारी उन्हाचे चटके

दोन दिवसांपासून रात्री सुरू असलेले वारा-वादळ व कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच उपनगर पिंप्राळा येथील काही भागात रविवारी मध्यरात्री अचानक वीजपुरवठा खंडित झाला. हा वीजपुरवठा तब्बल आठ तासांनी म्हणजे दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी १० वाजता सुरळीत झाला. त्यामुळे संपूर्ण रात्र नागरिकांना उकाड्यात काढावी लागली. एकीकडे महावितरणकडून भारनियमन केले जाणार नसल्याचे सांगितले जात असताना, दुसरीकडे वीजपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. शिरसोली येथेही मध्यरात्री वीजपुरवठा खंडित झाला होता.

Web Title: Power outage for eight hours in a row in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.