शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मानसिकता स्थिरता देण्याचे सामर्थ्य केवळ अध्यात्मातच - विद्या पडवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 12:16 IST

धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने अध्यात्माकडे वळणे गरजेचे

विजयकुमार सैतवालजळगाव : भौतिक साधनांसाठी आज प्रत्येकाच्या वाट्याला धावपळ, पळापळ येऊन सर्व जण धकाधकीचे जीवन जगत आहे. या भौतिक साधनांमुळे केवळ क्षणिक सुख मिळते व मनुष्य आपली मानसिक स्थिरता हरवून बसत आहे. ही मानसिक स्थिरता देण्याचे सामर्थ्य केवळ आध्यात्मात असून आज या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने अध्यात्माकडे वळणे गरजेचे आहे, असे मत विदुषी विद्या पडवळ (ठाणे) यांनी दिला.श्री दत्त जयंती महोत्सव व मार्गशीर्ष पौर्णिमा अशा योगावर जळगाव येथे श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण आयोजित करण्यात आले होते. ही पोथी मुखोद्गत सादर करणाऱ्या विद्या पडवळ या निमित्ताने जळगावात आल्या असता त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. त्या वेळी त्यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला हा संवाद.....प्रश्न - श्री गजानन विजय पोथीचे सर्व २१ अध्याय पाठ करण्यासाठी किती काळ लागला ?उत्तर - १९८९पासून मी रोज एक अध्याय वाचायचे तसेच शेगाव येथे होणाºया संपूर्ण पारायणसाठी जायचे. १९९७मध्ये असे वाटले की, हे आपल्याला तोंडपाठ आले पाहिजे. त्या वेळी मी घरीच ही पोथी मुखोद्गत सादर करू लागले व काही दिवसातच संपूर्ण अध्याय तोंडपाठ झाले.प्रश्न - या पोथीच्या जाहीर कार्यक्रमासाठी संधी कशी मिळाली?उत्तर - २०११मध्ये नाशिक येथे झालेल्या पारायणच्या आयोजकांना माझ्या मुखोद्गत अध्यायाबद्दल माहिती मिळाली. त्या वेळी त्यांनी निमंत्रण दिले. इतर ९ जणांसोबत तेथे मीदेखील अध्याय सादर केले. त्यात माझ्या सादरीकरणाची वेगळी शैली सर्वांनाच जाणवली व तेथून पुढे ठिकठिकाणी संधी मिळत गेली. १ जानेवारी २०१२रोजी अकोला येथे मी एकटीने संपूर्ण २१ अध्याय सादर केले तर २१ जानेवारी २०१८ रोजी अमरावती येथे झालेल्या पारायणासाठी तब्बल ५२ हजार भाविक उपस्थित होते.प्रश्न - आतापर्यंत मुखोद्गत पारायण कोठे-कोठे झाले?उत्तर - महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात तसेच विदेशातही श्री गजानन विजय पोथीचे मुखोद्गत पारायण झाले आहे. त्यामुळे विदेशात आजही अनेक ठिकाणी निमंत्रण मिळते.प्रश्न - विदेशातही अध्यात्माचा मार्ग दिसून आला का?उत्तर - हो नक्कीच. विदेशामध्येदेखील संत गजानन महाराज यांच्या जीवनातील प्रसंग, गोष्टी आवडू लागल्या आहेत. तेथील भारतीय रहिवासी व त्यांची मुलेदेखील या पोथीचे वाचन करतात.कथेच्या शैलीत सादरीकरणविद्या पडवळ या राज्य कथाकथन स्पर्धेच्या विजेत्या असून त्या विविध विषयांवर मार्गदर्शन करतात. तसेच एकांकीका सादरीकरणातही त्यांचा हातखंडा असून या सर्वांचा उपयोग त्यांना पोथी पाठांतरात झाला. इतकेच नव्हे तर कथाकथनमुळे पारायणदेखील कथा स्वरुपात सादर होऊ लागल्याने हीच वेगळी शैली सर्वांना भावत आहे. त्यामुळे भाविकांना संपूर्ण अध्याय पूर्ण होईपर्यंत ही शैली खिळवून ठेवते.‘श्री गजानन विजय’ सात भाषांमध्ये‘श्री गजानन विजय’ ही पोथी मराठी, संस्कृत, हिंदी, तेलगू, गुजराथी, इंग्रजीसह उर्दू अशा सात भाषांमध्ये आहे.आईची प्रेरणाविद्या पडवळ यांचे माहेर कोल्हापूरचे असून सासर संगमनेरचे आहे. त्यांच्या आई संत गजानन महाराजांच्या भक्त होत्या व त्यांच्याकडून आपल्याला या पोथी पारायणाची प्रेरणा मिळाल्याचे पडवळ यांनी सांगितले. आपले गुरु हे गजानन महाराजच असल्याचेही त्यांनी सांगितले.धार्मिक ग्रंथांचा सार हा श्री गजानन विजय ग्रंथात असून तो सोप्या शब्दात मांडला आहे. या पोथीचे जगभर वाचन केले जाते. या पोथीचे वाचन केल्यास मानसिक स्थिरता नक्की लाभते, असा विश्वास आहे.- विद्या पडवळ.

टॅग्स :Jalgaonजळगाव