खड्ड्यांमुळे वाहनधारकांची तारेवरची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:19 IST2021-09-06T04:19:27+5:302021-09-06T04:19:27+5:30
किनगाव, ता. यावल : बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर असलेले गिरडगाव ते वाघोदा या तीन कि. मी. अंतरावरील रस्त्यावर ...

खड्ड्यांमुळे वाहनधारकांची तारेवरची कसरत
किनगाव, ता. यावल : बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर असलेले गिरडगाव ते वाघोदा या तीन कि. मी. अंतरावरील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या तीन कि.मी. रस्त्यावर एका ठिकाणी जवळपास आठ ते दहा फूट रुंदीचे आकाराचे खड्डे पडले आहेत. सावदा रावेर, यावल व चोपडा येथून केळीने भरलेली शेकडो वाहने या रस्त्यावरूनच परराज्यात जात असतात; परंतु या ठिकाणी मोठे खड्डे असल्याने ट्रकचालकांना आपला जीव मुठीत ठेवून मोठी तारेवरची कसरत करत वाहने पास करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी याकडे लक्ष देऊन या ठिकाणी काम मार्गी लागत नसेल तर निदान खड्ड्यात मुरूम टाकून रस्ता दुरुस्ती करण्यात यावा, अशी मागणी वाहनधारकांनी व्यक्त केली आहे.