पाचोरा भुयारी मार्गावरील अतिक्रमण हटविण्यास तूर्तास स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST2021-06-26T04:12:30+5:302021-06-26T04:12:30+5:30

यासंदर्भात नगरसेवक भूषण वाघ यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत पाचोरा नगर परिषदेने नाल्यांवरील अतिक्रमण ...

Postponement to remove encroachment on Pachora subway | पाचोरा भुयारी मार्गावरील अतिक्रमण हटविण्यास तूर्तास स्थगिती

पाचोरा भुयारी मार्गावरील अतिक्रमण हटविण्यास तूर्तास स्थगिती

यासंदर्भात नगरसेवक भूषण वाघ यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत पाचोरा नगर परिषदेने नाल्यांवरील अतिक्रमण काढायला सुरुवात केली होती, परंतु आंदोलन होण्यापूर्वीच आमदार किशोर पाटील यांनी व्यावसायिक व न. पा. मुख्याधिकारी यांच्यात मध्यस्थी केल्यामुळे अतिक्रमण हटविण्यासाठी व्यापाऱ्यांना एक ते दीड महिन्यांचा कालावधी मिळाला आहे.

पाचोरा शहरातील शेतकरी सहकारी संघाजवळ असलेल्या नाल्यावर शहरातील काही व्यावसायिकांनी बेकायदेशीर बांधकाम केले आहे. भविष्यात नाल्यात व परिसरात पाणी साचल्यास परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भूषण वाघ यांच्या निदर्शनास येताच भूषण वाघ यांनी आज आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. यासंदर्भात आमदार किशोर पाटील यांनी संबंधित व्यावसायिक व नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क करून सदरचे अतिक्रमणाबाबत दोन्ही पक्षांच्या बाजू समजून घेण्यात याव्यात अशी सूचना केल्यावर आंदोलनकर्ते नगरसेवक भूषण वाघ व नगरपालिका मुख्याधिकारी यांचे एकमत झाल्याने सदरच्या अतिक्रमणास एक ते दीड महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. यावेळी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, नगरसेवक भूषण वाघ, नगरसेवक विकास पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच सुरक्षिततेसाठी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता.

Web Title: Postponement to remove encroachment on Pachora subway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.