मुक्ताईनगरात मोडेम जळाल्याने टपालसेवा ठप्प

By Admin | Updated: July 5, 2017 17:44 IST2017-07-05T17:44:46+5:302017-07-05T17:44:46+5:30

मुख्य पोस्ट कार्यालयातील मॉडेम जळाल्याने शनिवार पासून पोस्टल सेवा कोलमडली आहे.

The postal service was blocked by the burning of a modem in Muktainagar | मुक्ताईनगरात मोडेम जळाल्याने टपालसेवा ठप्प

मुक्ताईनगरात मोडेम जळाल्याने टपालसेवा ठप्प

 ऑनलाईन लोकमत

मुक्ताईनगर,दि.5-  शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयातील मॉडेम  जळाल्याने शनिवार पासून पोस्टल सेवा कोलमडली आहे. यात तातडीचे रजिस्टर व मनी ट्रान्स्फर सेवा पूर्णत: ठप्प आहे. नागरिकांना बँकेचे चेकबुक,महत्वाचे टपाल मिळत नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे
टपाल विभागाने काही दिवसांपासून संगणकीय प्रणालीचा अवलंब केला आहे. शनिवार पासून पोस्टकार्यालयातील  इंटरनेटसाठी वापरण्यात येणारे  मॉडेम जाळले आहे. यामुळे ऑनलाइन प्रणालीवर आधारित दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे 
  यामुळे  रजिष्टर सेवा, मनीट्रान्सफर सेवा, आदान प्रदान सेवा ठप्प झाल्या आहेत. तसेच पार्सल सेवाही ऑनलाईन असल्यामुळे इंटरनेट सुविधा सुरु झाल्या शिवाय पार्सल सुद्धा नागरीकांना पोहोचलेले नाहीत. बॅंकेने टपालद्वारे पाठविलेले चेकबुक वेळेवर मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त आहे.
पोष्टमास्तरांनी वरीष्ठ कार्यालयाकडे तक्रारी करुनही वरिष्ठ स्तरावरून काहीच हालचाल झालेली नाही.
 
 
शनिवारी इंटरनेट सेवेसाठी वापरण्यात येणारे मोडेम जळाल्याने सेवा ठप्प झाली आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयात माहिती दिली आहे. बुधवारी टेक्निशीयन दुरुस्तीसाठी येणार आहे. त्यानंतर लवकरच सर्व प्रणाली कार्यान्वित होईल.
            ए.ए.शेख, पोष्ट मास्तर, मुक्ताईनगर

Web Title: The postal service was blocked by the burning of a modem in Muktainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.