धरणगावला भाच्या नंतर पॉझिटिव्ह मामाचाही नाशिकला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 17:10 IST2020-07-02T17:09:40+5:302020-07-02T17:10:21+5:30
२ रोजी एकूण १० जण पॉझिटिव्ह...

धरणगावला भाच्या नंतर पॉझिटिव्ह मामाचाही नाशिकला मृत्यू
धरणगाव -- येथील मराठे गल्ली भागातील दुधवाला ५० वर्षीय पॉझिटिव्ह रुग्ण नाशिक येथे गेल्या १५ दिवसापासून खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता. उपचारादरम्यान १ रोजी रात्री त्यांच्या मृत्यू झाला. २ रोजी त्यांच्यावर नाशिक येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. दुध व्यावसायिक असलेला ४५ वर्षीय भाचाच्या मृत्यू नंतर १५ दिवसांनी दुध व्यावसायिक मामाचाही मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. १ रोजी मयत रुग्णाच्या पश्चात तीन मुलं ,पत्नी असा परिवार आहे.
धरणगावला रुग्णसंख्या १७७
धरणगाव तालुक्यात २ रोजी एकूण १० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.त्यात पाळधी खुर्द-०५ , झुरखेडा-०२ , मराठे गल्ली -२ व बेलदार मोहल्ला -०१ असे रुग्ण आहेत. आता एकूण १७७ रुग्णसंख्या झाली आहे. पैकी १६ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ यांनी दिली.
तसेच १०४ रुग्ण बरे होवून घरी गेले आहे. ५७ रुग्ण उपचार घेत आहेत.
प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार नितीन देवरे , कोवीड सेंटरचे प्रमूख डॉ.गिरीष चौधरी , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय सोनवणे मुख्याधिकारी जनार्दन पवार , सपोनि पवन देसले , मुख्याधिकारी जनार्दन पवार , नगराध्यक्ष नीलेश चौधरी आदींनी खबरदारीची उपाययोजना करुन नागरिकांना धिर दिला आहे.
आठवडे बाजार कडकडीत बंद...
गेल्या मार्च महिन्यापासून येथील गुरुवारचा आठवडे बाजार बंदच आहे. नगराध्यक्ष नीलेश चौधरी, मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी बुधवारी रिक्षा फिरवून गुरुवारचा आठवडे बाजार भरणार नसल्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार गुरुवारचा आठवडे बाजार भरला नाही.