प्लॅस्टिक पाइप्सचा वापर करून ‘मोझाइक’ आर्टमध्ये साकारले भवरलाल जैन यांचे पोट्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:31 AM2020-12-14T04:31:18+5:302020-12-14T04:31:18+5:30

फोटो : १४ सीटीआर ४३ जळगाव : जैन इरिगेशनचे संस्थापक स्व.भवरलाल जैन यांच्या ८३व्या जयंतीच्या औचित्याने प्लॅस्टिक पाइपचा उपयोग ...

Portrait of Bhavarlal Jain in 'Mosaic' art using plastic pipes | प्लॅस्टिक पाइप्सचा वापर करून ‘मोझाइक’ आर्टमध्ये साकारले भवरलाल जैन यांचे पोट्रेट

प्लॅस्टिक पाइप्सचा वापर करून ‘मोझाइक’ आर्टमध्ये साकारले भवरलाल जैन यांचे पोट्रेट

Next

फोटो : १४ सीटीआर ४३

जळगाव : जैन इरिगेशनचे संस्थापक स्व.भवरलाल जैन यांच्या ८३व्या जयंतीच्या औचित्याने प्लॅस्टिक पाइपचा उपयोग करून अनुभूती निवासी स्कूलच्या फुटबॉल ग्राउंडवर १०५ फूट लांब व ७५ फूट रुंद असे सुमारे ८ हजार चौरस फुटाची विस्तृत मोझाइक आर्टमधील कलाकृती साकारली. भवरलाल जैन यांचे हे पोट्रेट अत्यंत कल्पकतेने जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी त्यांच्या १५ सहकाऱ्यांच्या मदतीने अवघ्या तीन दिवसांत साकारली.

ही कलाकृती साकारण्यासाठी प्लॅस्टिक पाइप चांगले माध्यम राहणार असल्यामुळे काळ्या, करड्या, पांढऱ्या रंगांच्या पाइपांचा उपयोग केला गेला. जवळून ही कलाकृती फक्त पाइपांची मांडणी वाटते, परंतु उंचावरून अथवा ड्रोनने ही कलाकृती चांगल्यापद्धतीने दिसते. ही कलाकृती पाहण्यासाठी अनुभूती स्कूल परिसरातील सर्वांत उंच टेकडीवर महावीर पॉईंट येथून या मोठ्या कलाकृतीचा आनंद घेता येतो.

भवरलाल जैन यांच्याकडून मिळाली प्रेरणा–प्रदीप भोसले

जैन इरिगेशनच्या सोलर आर ॲण्ड डी विभागातील व्यवस्थापक प्रदीप भोसले कलाकारदेखील आहेत. ‘मोठी स्वप्ने बघा, म्हणजे आपल्या हातून मोठे काम होते,’ या भवरलाल जैन यांच्या एका सुविचाराने जगातील सर्वांत मोठी कलाकृती साकारण्याची प्रेरणा मिळाल्याचे भोसले यांनी सांगितले. रेषा, बिंदू, रंगसंगती हे चित्रकलेचे तंत्र वापरून सर्वांत मोठे मोझाइक आर्टमधील पोट्रेट साकार करण्याचे विचार भोसले यांनी बोलून दाखविले. कुठल्याही चांगल्या घडणाऱ्या गोष्टीला जैन परिवाराचे नेहमीच प्रोत्साहन असते. त्यामुळेच ्ध्यक्ष अशोक जैन यांना संकल्पना आवडली व ती साकारण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन व मदत केली. प्रशांत भारती, प्रकाश पाटील, अनिल पाटील, अजय काळे, सारंग जेऊरकर आणि संतोष पांडे यांसह इतर १५ सहकाऱ्यांच्या मदतीने परिश्रम करीत कलाकृती साकारल्याचे भोसले यांनी सांगितले.

आठवडाभर बघता येणार कलाकृती

ही कलाकृती या आठवड्यात त्याच परिसरातील महावीर पॉईंट येथून सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या दरम्यान पाहता येणार आहे. भविष्यात ही कलाकृती स्थापित करण्याचे नियोजन आहे, असे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले.

फोटो कॅप्शन - जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी जैन पाइप्सचा उपयोग करून साकारलेली भवरलाल जैन यांची कलाकृती.

Web Title: Portrait of Bhavarlal Jain in 'Mosaic' art using plastic pipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.