शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले पोलिसाचे प्राण

By admin | Updated: July 16, 2017 12:33 IST

वाहने आडवे लावून कार थांबवून सोनवणेंची सुटका केली.

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 16 - पोलीस लिहिलेली प्लेट पाहून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एक कार अडविली. चालकाकडे कोणतीच कागदपत्रे नसल्याने डय़ुटीवर असलेल्या वाहतूक शाखेचे कर्मचारी संतोष वामन सोनवणे यांनी कारमध्ये बसून कार वाहतूक शाखेच्या कार्यालयात नेण्यास सांगितले असता मागे बसलेल्या एकाने दरवाजे लॉक करुन सोनवणे यांना दाबून धरले तर चालकाने भरधाव वेगाने कार पाळधीच्या दिशेन पळविली. घारबलेल्या सोनवणे यांनी लाथ मारुन दरवाजा उघडला व आरडाओरड केली. हा प्रकार पाहून प्रभात चौकात थांबलेल्या तीन जणांनी कारचा पाठलाग केला व आयटीआयजवळ वाहने आडवे लावून कार थांबवून सोनवणेंची सुटका केली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाहतूक पोलिसाचे प्राण वाचले.सोनवणे यांनी जोराने लाथमारुन दरवाजा उघडला व दरवाजाला पाय लावून धरत आरडा ओरड केली. प्रभात चौकाच्या पुढे रस्त्यावर थांबलेले सर्वसामान्य नागरिक असलेल्या अनिल प्रकाश सपकाळे, मच्छींद्र उत्तम सोनवणे व रामचंद्र सोनवणे यांनी हा प्रकार कारचा पाठलाग केला. आयटीआयजवळ दुचाकी आडव्या लावून कार थांबवून सोनवणे यांची सुटका केली. यावेळी कारमधील अरविंद भाई नावाचा तरुण पसार झाला. येणारे जाणारे थांबत असल्याने या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. वाहतूक शाखेचे संतोष शिंदे, शिवाजी माळी,महेंद्र पाटील, रवी इधाटे, सहायक फौजदार गुलाब मनोरे व नरेंद्र बागुल यांनी घटनास्थळी गाठून कारसह आरोपींना वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणले.आकाशवाणी चौक जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने या तोतया पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आले. तेथे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्यासमोर दोघांना हजर करण्यात आले. त्यांची चौकशी केली असता रमेशभाई उखाभाई या नावाचे सुरत पोलिसाचे ओळखपत्र आढळून आले. सोनवणे यांची सुटका झाली ते ठिकाण रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने गायकवाड यांनी संशयितांना कारसह तिकडे पाठविले. आरोपींजवळ असलेली ही कार रमेश भाई यांची असून ते सुरत येथील लिंबायत पोलीस स्टेशनला कार्यरत असल्याचे दोघांकडून सांगितले जात होते. कार व ओळखपत्र खरे की खोटे याची पोलीस चौकशी करीत आहेत. पकडण्यात आलेले अशोक बग्गाभाई रबारी व प्रवीण गोकुळभाई रबारी असे दोघांची नावे सांगत आहेत. आपण सुरत येथे कापड गिरणी व हिरा कारखान्यात काम करतो.नागपूर येथे मित्राला भेटण्यासाठी गेलो होतो असे ते सांगत आहेत. फरार झालेल्या तिस:या साथीदाराचे अरविंदभाई इतकेच ते नाव सांगत आहेत.एकूणच त्यांची माहिती खरी की खोटी हे स्पष्ट झालेले नाही.कारमधील तिन्ही जण शरीराने मजबूत होते. ‘याला पकडून ठेव सोडू नको, पुढे बघू त्याचे कार करायचे‘ असे ते गुजरातीमधून बोलत होते. लाथ मारुन दरवाजा उघडला व त्यामुळे आरडाओरड करता आली व रस्त्यावरील नागरिकांमुळे आपण बचावलो, अन्यथा महामार्गावर भरधाव कारमधून त्यांनी फेकले असते तर आज जीवंत राहिलो नसतो असे सोनवणे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.