पोलिसांच्या त्रिकूटाला लाचखोरीची हुडहुडी !

By Admin | Updated: November 1, 2015 00:24 IST2015-11-01T00:24:50+5:302015-11-01T00:24:50+5:30

धुळे : 1 लाख 20 हजार रुपयांची लाच घेताना दोन पोलीस कर्मचा:यांसह त्यांच्या साथीदाराला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ए़सी़बी) पथकाने रंगेहाथ पकडल़े

Police trio bribe bribe! | पोलिसांच्या त्रिकूटाला लाचखोरीची हुडहुडी !

पोलिसांच्या त्रिकूटाला लाचखोरीची हुडहुडी !

धुळे : कार सोडविण्यासाठी तडजोडीअंती 1 लाख 20 हजार रुपयांची लाच घेताना दोन पोलीस कर्मचा:यांसह त्यांच्या साथीदाराला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ए़सी़बी) पथकाने रंगेहाथ पकडल़े यात धुळे तालुका पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अशोक पायमोडे, हवालदार कमलाकर पाटील व त्यांचा साथीदार शंकर मेघानी यांचा समावेश आहे. ही कारवाई शनिवारी सायंकाळी शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ करण्यात आली़

विषारी दारूसाठय़ाचा गुन्ह्यात पोलिसांनी एक कार जप्त केली होती़ ती कार सोडावी, अशी मागणी तक्रारदाराने केली होती़

मात्र ही कार सोडण्यासाठी दीड लाखाची मागणी करण्यात आली़ त्यामुळे पोलीस निरीक्षक माधवी चौधरी, देशमुख, पो़ह़ेकॉ हांडगे, डोंगरे, शिंपी आदींचा पथकाने ही कारवाई केली.

 

निरीक्षकांवर आरोप

सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका व्हिडिओ क्लीपमध्ये तक्रारदाराने पोलीस निरीक्षक रमेश मुंडे यांनी दीड लाख रुपये लाच मागितली आणि तडजोडीअंती 1 लाख 20 हजार रुपये पायमोडे यांच्याकडे द्या, असे सांगितल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक मुंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Police trio bribe bribe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.