जळगाव : पोलीस स्टेशनमधील सुरूअसलेल्या कामकाजाची माहिती मोबाईलवर दिसावी यासाठी तयार करण्यात आलेल्या सीसीटीव्ही सिक्युरिटी सर्व्हेलन्स योजनेचा २६ जानेवारी रोजी पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. १४ लाखांच्या निधीतून झाले काम पोलीस स्टेशनच्या कामकाजात पारदर्शकता यावी यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत जिल्हा नियोजन विकास मंडळाकडे १४ लाखांच्या निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. १४ लाखांचा निधी मिळाल्यामुळे ही योजना राबविण्यात आली. काय आहे योजना? जिल्ह्यातील ३0 पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी चार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यात पोलीस लॉकअपचा समोरील भाग, पोलीस स्टेशनची इमारत, ठाणे अंमलदार यांचा टेबल आणि प्रभारी अधिकार्याच्या कॅबीनचा समावेश आहे. योजनेचा फायदा काय? पोलीस स्टेशनच्या लॉकअपला नियुक्त केलेले कर्मचारी प्रामाणिकपणे ड्युटी करीत आहेत का? तक्रारदार आल्यानंतर ठाणे अंमलदार त्यांच्यासोबत कसे वर्तन करीत आहेत. ही माहिती पोलीस अधीक्षकांना कोणत्याही क्षणी आपल्या मोबाईलवर पाहता येणार आहे. |
पोलीस स्टेशन मोबाईलवर दिसणार
By admin | Updated: January 28, 2015 13:46 IST