शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरती : वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज असल्यास चाचणीत चार दिवस ‘गॅप’, उमेदवारांना दिलासा

By विजय.सैतवाल | Updated: June 17, 2024 15:28 IST

पावसामुळे अडथळा आला तरी पुढील तारीख

जळगाव : पोलीस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीसाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी वेळ मिळाली असल्यास त्या उमेदवाराला दोन्ही ठिकाणी संधी मिळण्याची सुविधा पोलीस दलाकडून उपलब्ध करून दिली आहे. यात एका ठिकाणी परीक्षा दिल्यानंतर चार दिवसांचे अंतर ठेवून त्या उमेदवाराला दुसऱ्या ठिकाणी परीक्षा देता येईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.  

पोलीस भरती प्रक्रियेतील या सुविधेची माहिती देण्यासाठी सोमवार, १७ जून रोजी पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सांगितले की, पोलिस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी १९ जूनपासून राज्यभरात मैदानी चाचणी परीक्षा सुरु होणार आहे. जळगाव जिल्ह्यात केवळ पोलीस शिपाई या पदासाठी भरती होत आहे. मात्र राज्यात इतर ठिकाणी पोलीस शिपाई, चालक, बँडस् मन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई या पदांसाठी भरती होत आहे. त्यामुळे उमेदवारांनी विविध पदांकरिता एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकांत वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केले आहे. त्यात राज्यभरात एकाच दिवशी मैदानी चाचणी सुरू होत आहे.   

काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठच्या दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होवू शकते. त्यामुळे अशा उमेदवरांची गैरसोय होऊ नये म्हणून ज्या उमेदवारास एकाच वेळी दोन पदांकरिता मैदानी चाचणीस हजर राहण्यासाठी सूचना दिली असेल तो उमेदवार पाहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्याला दुसऱ्या ठिकाणी चार दिवसांचे अंतर ठेवून वेगळी तारीख देण्यात येणार आहे. या सोबतच चाचणीदरम्यान पावसाचा अडथळा आल्यास पुढील सुयोग्य तारीख दिली जाईल, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.  

लेखी पुरावा आवश्यक 

दुसऱ्या ठिकाणी मैदानी चाचणीवेळी पहिल्या मैदानी चाचणीस हजर असल्याबाबतचे लेखी पुरावे उमेदवाराला सादर करावे लागणार आहे. अशा उमेदवारांना पुढील तारीख मिळण्यासाठी उमेदवार वैयक्तिकरित्या त्या-त्या ठिकाणी संपर्क साधून वेळ मिळवू शकतो किंवा पहिल्या चाचणीच्या ठिकाणचे घटक प्रमुख तशी सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. यात दुसऱ्या ठिकाणच्या घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी, अशा सूचना वरिष्ट पातळीवरून घटक प्रमुखांना दिल्या असल्याचे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस