पोलीस कॉन्स्टेबल यांच्या घरातून सव्वादोन लाखाचा मुद्देमाल लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:13 IST2021-05-28T04:13:54+5:302021-05-28T04:13:54+5:30
२५ रोजी दुपारी ३.३० वाजता दीपक जगताप हे धुळे येथे नातेवाईकांच्या लग्न कार्यक्रमासाठी जात असताना घराला कुलूप लावून त्याची ...

पोलीस कॉन्स्टेबल यांच्या घरातून सव्वादोन लाखाचा मुद्देमाल लांबविला
२५ रोजी दुपारी ३.३० वाजता दीपक जगताप हे धुळे येथे नातेवाईकांच्या लग्न कार्यक्रमासाठी जात असताना घराला कुलूप लावून त्याची चावी त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहणारे भाडेकरू प्रेमसिंग ऊर्फ बबलू राजपूत यांच्याकडे दिली होती. २६ रोजी रात्री घरी परत आल्यावर जगताप यांना घराचे दार उघडे दिसले. कुलूप बाहेर भिंतीवर ठेवलेले होते. घरातील लाकडी कपाटाचे दरवाजेही उघडे होते. या कपाटातील एक लाख ६८ हजार रुपयाची रोकड, २० हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, १६ हजार रुपये किमतीची चार ग्रॅम कानातील टॉप्स, २० हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची चेन असा एकूण २ लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
यावेळी प्रेमसिंग राजपूत यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून त्यांच्यावर जगताप यांनी संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात दीपक जगताप यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम ३८०, ४५४, ४५७ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.