तीन जुगार अड्डयांवर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:16 IST2021-04-07T04:16:37+5:302021-04-07T04:16:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी दुपारी तीन जुगार अड्डयांवर कारवाई करीत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. ...

तीन जुगार अड्डयांवर पोलिसांचा छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी दुपारी तीन जुगार अड्डयांवर कारवाई करीत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे अडीच ते तीन हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
खेडी पेट्रोलपंप परिसर, सिंधी कॉलनी तसेच रामेश्वर कॉलनी येथे सट्टा जुगार सुरु असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मंगळवारी सकाळी मिळाली होती. एमआयडीसी पोलिसांनी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास रामेश्वर कॉलनीतील अशोक किराणाजवळ सुरू असलेल्या जुगार अड्डयावर धाड टाकली. तेथे कुणाल एकनाथ हेरापले, साहिल धारवाल, विक्रम नाईक हे जुगार खेळताना आढळून आले. त्यानंतर दीड वाजता पोलिसांनी खेडी पेट्रोलपंपाजवळ सुरू असलेल्या अवैध जुगार अड्डयावर छापा मारला. त्याठिकाणी दीपक रमेश मोरे हा जुगार खेळविताना आढळून आला तर दुपारी २ वाजता सिंधी कॉलनी भागतील जुगार अड्डयावर धाड टाकल्यावर तेथे शब्बीर खान हमीद खान हा जुगार खेळताना आढळून आला. या संपूर्ण कारवाईतील पाचही जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळून सुमारे अडीच ते तीन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच पाचही जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.