जळगाव शहरातील गांधी मार्केटमध्ये जुगार अड्डयावर पोलिसांची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:17 IST2018-02-06T23:15:38+5:302018-02-06T23:17:58+5:30
गांधी मार्केटमध्ये तळघरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी सायंकाळी परिविक्षाधीन उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी धाड टाकली. त्यात सात जुगा-यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १४ हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. या सर्वाविरुध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील गांधी मार्केटमध्ये जुगार अड्डयावर पोलिसांची धाड
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,६ : गांधी मार्केटमध्ये तळघरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी सायंकाळी परिविक्षाधीन उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी धाड टाकली. त्यात सात जुगा-यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १४ हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. या सर्वाविरुध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केशव शंकर चौधरी (वय ३० रा.शिवाजी नगर, हुडको जळगाव), भगवान कमलाकर बाविस्कर (वय ३२ रा.कांचन नगर, जळगाव), वायरमन सोपान कृष्णा महाजन (वय ४९ रा.खोटे नगर, जळगाव), ज्ञानेश्वर अर्जुन इंगळे (वय ३१ रा.कांचन नगर, जळगाव),अबरार सय्यद मुस्ताक (वय ३० गिरणा टाकी, जळगाव), रतिलाल सुरेश बाविस्कर (वय ३५ रा.कोळंबा, ता.चोपडा) व विकास देविदास सोनवणे (रा.कांचन नगर, जळगाव) यांचा समावेश आहे.