सट्टा-जुगार अड्डयावर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:21 IST2020-12-30T04:21:40+5:302020-12-30T04:21:40+5:30

जळगाव : शहरातील आत्महत्या कॉलनी परिसरातील रेल्वेलाईनच्या जवळ सुरू असलेल्या सट्टा-जुगाराच्या अड्डयावर मंगळवारी दुपारी सव्वा वाजता रामानंदनगर पोलिसांनी धाड ...

Police raid a gambling den | सट्टा-जुगार अड्डयावर पोलिसांची धाड

सट्टा-जुगार अड्डयावर पोलिसांची धाड

जळगाव : शहरातील आत्महत्या कॉलनी परिसरातील रेल्वेलाईनच्या जवळ सुरू असलेल्या सट्टा-जुगाराच्या अड्डयावर मंगळवारी दुपारी सव्वा वाजता रामानंदनगर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत ८ हजार ७६० रूपयांचे सट्टा-जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून चार जणांविरूध्द रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्महत्या कॉलनी परिसरातील रेल्वेलाईनजवळील काटेरी झुडपांच्या जवळ बंडू महाजन व बापू राजपूत यांच्या सांगणावरून कमीशनवर तीन ते चार व्यक्ती सट्टा-जुगार खेळवित असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच कारवाईच्या सूचना केल्यानंतर पोलीस कर्मचारी भरत बाविस्कर, किरण पाटील, शुभम बाविस्कर, रवींद्र महाजन, रमेश खोडपे, गोविंदा सुरवाडे आदींच्या पथकाने मंगळवारी दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास सट्टा-जुगार अड्डयावर धाड टाकली. यावेळी निखिल सुरेश पाटील (३४, रा.खोटेनगर), सतिष सुरेशसिंग पाटील (३६, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा), अफजल खान ईब्राहिमखान (३५, दोन्ही रा. खंडेरावनगर) हे चौघे सट्टा-जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी यांच्यावर कारवाई करीत त्यांच्याजवळून ८ हजार ७६० रूपयांचे सट्टा-जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Police raid a gambling den