जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत सट्टा अड्डयावर पोलिसांची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 20:31 IST2018-01-25T20:28:30+5:302018-01-25T20:31:24+5:30
सिंधी कॉलनी परिसरात एका व्यापारी संकुलात सुरु असलेल्या सट्टा अड्डयावर गुरुवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या पथकाने धाड टाकली. त्यात १५ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३६ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत सट्टा अड्डयावर पोलिसांची धाड
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२५ : सिंधी कॉलनी परिसरात एका व्यापारी संकुलात सुरु असलेल्या सट्टा अड्डयावर गुरुवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या पथकाने धाड टाकली. त्यात १५ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३६ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सिंधी कॉलनीत भाजी बाजारामागे एका व्यापारी संकुलात पहिल्या मजल्यावर सट्टा सुरु असल्याची माहिती उपअधीक्षक सचिन सांगळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी परिविक्षाधीन उपअधीक्षक धनंजय पाटील, उपअधीक्षक कार्यालयातील अनिल पाटील, सुनील पाटील, रवींद्र मोतीराया, ज्ञानेश्वर पाटील यांचे पथक कारवाईसाठी पाठविले होते. या पथकाने दुपारी अचानकपणे धाड टाकली असता तेथे १५ जणांना पकडण्यात आले. सट्टा पेढी मालक प्रकाश चेलाराम कुकरेजा (रा.सिंधी कॉलनी, जळगाव) यालाही आरोपी करण्यात आले.
यांना केली अटक
मुरलीधर विश्वनाथ चव्हाण, सागर नाना म्हस्के, बन्सीलाल सोनुमल सिंधी, प्रवीण काशिनाथ लोहार, अशोक सलामतराय मकडिया, रमेश तोताराम परदेशी, राजू पंडीत अडकमोल, रमेश हरी शर्मा, कैलास एकनाथ जाधव, ओमप्रकाश संतदास वालेचा, घनश्याम लक्ष्मणदास कुकरेजा, अशोक सावलाराम वैराग, अय्युबखा हुसेनखा, भगवान मागो जोशी, विक्रात लालचंद पाटील व नरेश नथ्थू धोबी यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरुन या सर्वांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.