भडगाव येथे मुस्लीम पंच कमिटीतर्फे पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST2021-08-22T04:19:16+5:302021-08-22T04:19:16+5:30

यावेळी पोलीस निरिक्षक अशोक उतेकर व पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना महामारीच्या वेळेस ...

Police personnel felicitated by Muslim Punch Committee at Bhadgaon | भडगाव येथे मुस्लीम पंच कमिटीतर्फे पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार

भडगाव येथे मुस्लीम पंच कमिटीतर्फे पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार

यावेळी पोलीस निरिक्षक अशोक उतेकर व पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे यांचा सत्कार करण्यात आला.

कोरोना महामारीच्या वेळेस चांगली कामगिरी व मुस्लीम धर्माचे सण रमजान ईद, बकरी ईद, मोहरम या सणात हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक म्हणून भडगावमध्ये मोहरम सण हे फार वर्षांपासून सुरू आहे. या काळात जिवाची पर्वा न करता भडगाव पोलीस स्टेशन हे दिवस आणि रात्र सेवा देत आहे.

पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे यांची बदली नाशिक ग्रामीणला झाली आहे. तसेच भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक लक्ष्मण पाटील व गुन्हे (गुप्त) शाखेचे पोलीस काॅन्स्टेबल ईश्वर पाटील यांची बदली जळगाव एलसीबीला झाली आहे. म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नाशिक येथील उद्योगपती व नगरसेवक आर. आर. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात जलाली मोहल्ला मुस्लीम पंच कमिटीचे इसाक मलीक, इकबाल मनियार, खालीक शेख, सलीम शेख, अख्तर मुल्लाजी, समद मुल्लाजी, अच्छू शेख, गनीबाबा, अशपाक शेख, जमील काझी, अकबर शाह, सत्तार शाह, इस्माइल मलीक, सलीम मुन्शी, सादिक शाह, मुन्ना भाई, अयाज शेख, रफिक शेख , तसेच अँग्लो ऊर्दू हायस्कूलचे संचालक अमान ऊल्हाह खान, सागर परदेशी, सोनू मुनाफ खाटीक, सलमान खान आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अजहर खान व आभार इसाक मलिक यांनी मानले.

Web Title: Police personnel felicitated by Muslim Punch Committee at Bhadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.