अंतुर्ली फाटा येथील पोलीस चौकी अखेर मध्यप्रदेश हद्दीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:12 IST2021-06-10T04:12:51+5:302021-06-10T04:12:51+5:30

बऱ्हाणपूर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश कोरोना बंदोबस्तामुळे मध्यप्रदेश शासनाने लावलेल्या पोलीस नाक्यावर मुक्ताईनगर येथील रुग्णालयातून घरी जात असताना अंतुर्ली येथील सहा ...

The police outpost at Anturli Fata is finally in Madhya Pradesh | अंतुर्ली फाटा येथील पोलीस चौकी अखेर मध्यप्रदेश हद्दीत

अंतुर्ली फाटा येथील पोलीस चौकी अखेर मध्यप्रदेश हद्दीत

बऱ्हाणपूर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

कोरोना बंदोबस्तामुळे मध्यप्रदेश शासनाने लावलेल्या पोलीस नाक्यावर मुक्ताईनगर येथील रुग्णालयातून घरी जात असताना अंतुर्ली येथील सहा दिवसांचे नवजात बाळ व सिझर शस्त्रक्रिया झालेल्या महिलेला दवाखान्याची कागदपत्रे दाखवल्यावरसुद्धा मध्यप्रदेश पोलिसांनी थांबवून गाडीच्या खाली उतरवून त्रास दिला.

मुक्ताईनगर येथून अंतुर्ली परिसरात जाण्यासाठी इच्छापूर मार्गे राष्ट्रीय महामार्ग हा मुख्य रस्ता आहे. मध्यप्रदेश पोलिसांनी लावलेल्या नाक्यामुळे परिसरातील नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठा त्रास होत आहे.

दरम्यान, खासदार रक्षा खडसे ह्या अंतुर्ली येथे द्वार दर्शनासाठी जात असताना त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ बऱ्हाणपूरचे जिल्हाधिकारी प्रवीण सिंग यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत सदर गोष्ट लक्षात आणून दिली, तसेच नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती देऊन तत्काळ सदर पोलीस चौकी मध्यप्रदेश हद्दीत हलविण्याचा आदेश दिला. तेव्हा ही चौकी हलविण्यात आली.

मागील वर्षीसुद्धा या पोलीस चौकीमुळे अंतुर्ली येथील नागरिकास जीव गमवावा लागला होता. तेव्हा संतप्त नागरिकांनी पोलीस बंदोबस्त नाका हटविण्यासाठी आंदोलन केले होते. खासदार खडसेंनी प्रत्यक्ष आंदोलन ठिकाणी जाऊन बऱ्हाणपूर जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून सदर महाराष्ट्र सीमेत असलेला नाका शाहपूर रस्त्यावरील शिरसोदा फाट्यावर हलविण्यात आला होता; परंतु आता पुन्हा सदर तपासणी नाक्यामुळे परिसरातील ये-जा करणाऱ्या समस्त नागरिक, शेतकरी व वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. हा नाका मध्यप्रदेश हद्दीत हलविण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: The police outpost at Anturli Fata is finally in Madhya Pradesh