दारु तस्करी भोवली; पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 15:16 IST2020-04-29T15:14:48+5:302020-04-29T15:16:45+5:30
लॉकडाऊनमधील दारु तस्करी भोवली; घरी जाऊन बजावले आदेश

दारु तस्करी भोवली; पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ बडतर्फ
जळगाव : लॉकडाऊन काळातील दारु तस्करी प्रकरणात दोषी आढळलेले एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना सेवेतून कायमस्वरुपी बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस महासंचालकांच्या आदेशाची प्रत शिरसाठ यांना बुधवारी सकाळी घरी जाऊन बजावण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ही माहिती 'लोकमत'ला दिली.
दरम्यान, याच प्रकरणात मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेचे जीवन काशिनाथ पाटील, जिल्हा पेठचे संजय जगन्नाथ जाधव व मुख्यालयाचे मनोज केशव सुरवाडे या तिघांना सेवेतून बडतर्फ तर तालुका पोलीस ठाण्याचे भारत शांताराम पाटील यांना निलंबित करण्यात आले होते. शिरसाठ यांचा बडतर्फीचा प्रस्ताव दोन दिवसापूर्वीच महासंचालकांकडे पाठविण्यात आला होता. मंगळवारी रात्री बडतर्फीचे आदेश पोलीस अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानंतर बुधवारी सकाळी कर्मचाºयांमार्फत आदेशाची बजावणी करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाची अजूनही चौकशी सुरुच असून आणखी कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.