ट्रॅव्हल्स थांब्याबाबत पोलिसांच्या पोकळ घोषणा

By Admin | Updated: October 9, 2015 01:03 IST2015-10-09T01:03:31+5:302015-10-09T01:03:31+5:30

जळगाव : ट्रॅव्हल्सचा थांबा गणेशोत्सवानंतर सुरू केला जाणार असल्याची घोषणा खुद्द पोलीस अधीक्षकांनीच केली होती. मात्र या सर्व घोषणा पोकळ ठरू लागल्या असल्याचा सूर शहरवासीयांकडून उमटू लागला आहे.

Police Hollow Declaration on Stop Stops | ट्रॅव्हल्स थांब्याबाबत पोलिसांच्या पोकळ घोषणा

ट्रॅव्हल्स थांब्याबाबत पोलिसांच्या पोकळ घोषणा

जळगाव : बाहेरगावी जाणा:या सर्व ट्रॅव्हल्सचा एकाच ठिकाणी थांबा असावा, यासाठी गेल्या दीड महिन्यापासून केवळ घोषणाबाजीच सुरू आहे, प्रत्यक्ष अंमलबजावणीच होत नाही. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी कायम आहे. जागा तयार होवूनही थांबा सुरू झालेला नाही. गणेशोत्सवानंतर हा थांबा सुरू केला जाणार असल्याची घोषणा खुद्द पोलीस अधीक्षकांनीच केली होती. मात्र या सर्व घोषणा पोकळ ठरू लागल्या असल्याचा सूर शहरवासीयांकडून उमटू लागला आहे.

जागा शोधण्यात गेले पंधरा दिवस

प्रारंभीच्या काळात जागा शोधण्यातच पंधरा दिवस गेले. अनेक भागातील सहा ठिकाणांचा पर्याय शोधल्यानंतर त्यावर एकमत करण्यासाठी दहा जणांची समिती नेमण्यात आली. समितीतील सदस्य वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकात सरोदे, प्रमोद झांबरे यांच्यासह अन्य काही जणांनी खान्देश मिल व विठ्ठल मंदिर संस्थानची नेरी नाक्याजवळील अशा दोन जागांचा सव्र्हे केल्यानंतर विठ्ठल मंदिर संस्थानच्या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

ट्रॅव्हल्सचालकांकडून दिरंगाई

अकरा महिन्यांच्या कराराने ही जागा भाडे तत्त्वावर घेण्यात आली. त्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी पोलीस अधीक्षकांनीच पुढाकार घेतला. रस्त्यातील खांब हटविण्यासाठी महावितरणला सूचना देण्यात आल्या. मनपाने वीज पुरविण्याचे आश्वासन दिले. जागेवरच मुरूम टाकण्यात आला. ट्रॅव्हल्स आजच थांबू शकतील अशी जागा तयार झालेली आहे. परंतु काही ट्रॅव्हल्सचालकांकडूनच यात दिरंगाई केली जात आहे. सुरुवातीला गणेशोत्सवानंतर थांबा कार्यान्वित होईल असे सांगण्यात आले होते. आता नवरात्रौत्सव व दसरा, दिवाळी हे सिझन असल्याने ट्रॅव्हल्स बाहेर जाऊ नये अशी अनेकांची मानसिकता झाली आहे. त्यासाठी पितृपक्षाचेही कारण पुढे केले जात आहे.

दावाही फेटाळला

एका ट्रॅव्हल्समालकाने या थांब्याला विरोध म्हणून न्यायालयात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व उपप्रादेशिक परिवहन अधिका:यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता कोणतेही कारण नसताना थांबा का सुरू केला जात नाही, असा प्रश्न शहरवासीयांकडून विचारला जात आहे. नवरात्रौत्सवापूर्वी हा थांबा सुरू केला जावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

थांब्याचे काम झाले आहे. विजेची व खांबांची किरकोळ अडचण आहे. ते काम झाले की थांबा सुरू करू. कुठल्याही परिस्थितीत हा थांबा सुरू होईलच.

-डॉ.जालिंदर सुपेकर,

पोलीस अधीक्षक

 

Web Title: Police Hollow Declaration on Stop Stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.