सणांच्या पार्श्वभूमीवर भुसावळात पोलिसांचे शक्तिपदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST2021-09-08T04:21:15+5:302021-09-08T04:21:15+5:30
पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रक्षोभक जमाव पांगवण्यासाठी मुख्य रस्ते, चौक आणि संवेदनशील भागात मॉकड्रिल घेण्यात आले. भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, ...

सणांच्या पार्श्वभूमीवर भुसावळात पोलिसांचे शक्तिपदर्शन
पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रक्षोभक जमाव पांगवण्यासाठी मुख्य रस्ते, चौक आणि संवेदनशील भागात मॉकड्रिल घेण्यात आले. भुसावळचे
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे तसेच तिन्ही पोलीस ठाण्यांचे पोलीस कर्मचारी यात सहभागी होते. भुसावळ शहरातील आगामी श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मॉकड्रिल घेण्यात आले.
या दरम्यान डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी गणेश मंडळातील कार्यकर्त्यांना गणेश मंडळाची कशा पद्धतीने बांधणी करावी, तसेच गणेश मंडळांची परवानगी घेणे अत्यंत अनिवार्य आहे आणि बांधणी करण्यात आलेल्या मंडळांच्या बाजूने चारचाकी वाहन जाईल, एवढी जागा ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच सर्वधर्मीयांनी खेळीमेळीचे वातावरण ठेवावे, नागरिकांना कायद्याचा धाक असावा आणि समाजकंटकांवर पोलीस प्रशासनाचा अंकुश असावा, यासाठी मॉकड्रिल घेण्यात आले.
भुसावळकर अचंबित
अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात मॉकड्रिल घेण्यात आले. प्रारंभी पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने आलेले पाहून भुसावळकर अचंबित झाले. येणाऱ्या-जाणाऱ्यांना नेमकं काय झाले, याची उत्सुकता लागली होती. मात्र थोड्याच वेळात पोलीस अधिकाऱ्यांनी पुरुष आणि महिला पोलिसांकडून प्रक्षुब्ध जमावाला पांगवण्यासाठी संरक्षक फायबर काचेच्या मदतीने मॉकड्रिल आणि प्रात्यक्षिक करून घेतले.
यादरम्यान गोपनीय विभागाचे बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संदीप परदेशी शहर पोलीस ठाण्याचे प्रमोद पाटील उपस्थित होते.
फोटो कॅप्शन :- भुसावळ येथील श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरातील मध्यवर्ती भागात काल दि. ६ सप्टेंबर, सोमवारी रात्रीच्या सुमारास मॉकड्रिल करताना पोलीस अधिकारी व कर्मचारी.
( छाया:- हबीब चव्हाण)