संगणक लांबविणा-यांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:12 IST2020-12-27T04:12:06+5:302020-12-27T04:12:06+5:30

जळगाव : निर्मलाबाई लाठी शाळेतील मनपा घरपट्टी विभागाच्या कार्यालयातील संगणक व प्रिंटर जुलै महिन्यात चोरीला गेले होते. याप्रकरणी अविनाश ...

Police custody of computer hackers | संगणक लांबविणा-यांना पोलीस कोठडी

संगणक लांबविणा-यांना पोलीस कोठडी

जळगाव : निर्मलाबाई लाठी शाळेतील मनपा घरपट्टी विभागाच्या कार्यालयातील संगणक व प्रिंटर जुलै महिन्यात चोरीला गेले होते. याप्रकरणी अविनाश राठोड व दीपक पटेल या चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, २९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सुमारे ६९ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी मनपाच्या घरपट्टी विभागाच्या कार्यालयातून चोरून नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल होता. शुक्रवारी या गुन्ह्यात एलसीबीच्या पथकाने अविनाश राठोड व दीपक पटेल या दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्यानंतर पुढील कारवाईसाठी दोघांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. शनिवारी अविनाश व दीपक या दोघांना न्यायालयात हजर केले असता, सुनावणीअंती दोघांना २९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास अतुल वंजारी करीत आहेत.

Web Title: Police custody of computer hackers